Premium

VIDEO : मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देणार? एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केली भूमिका; म्हणाले…

ओबीसी, अनुसूचित आणि भटक्या विमुक्त जातीच्या शिष्टमंडळाची बैठक पार पडली आहे.

eknath shinde
ओबीसी बैठकीनंतर एकनाथ शिंदेंनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ( छायाचित्र – सीएमओ एक्स अकाउंट )

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ओबीसी, अनुसूचित आणि भटक्या विमुक्त जातीच्या शिष्टमंडळाबरोबर बैठक पार पडली. यानंतर एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. मराठा समाजाला रद्द झालेलं आरक्षण मिळवून देणार. ओबीसी किंवा अन्य समाजावर अन्याय करणार नाही, असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एकनाथ शिंदे म्हणाले, “मराठा समाजाला अन्य समाजाचं आरक्षण दिलं जाईल, अशी भीती ओबीसींच्या मनात होती. पण, अन्य समाजाचं आरक्षण कमी करून मराठ्यांना आरक्षण देण्याची भूमिका सरकारची नाही. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण दिल्यावर ओबीसींमध्ये अशाच प्रकारची भीती आणि शंका होती. मात्र, तेव्हाही सरकारनं भूमिका जाहीर केली. आजही तीच भूमिका आहे.”

हेही वाचा : बारामती अ‍ॅग्रोबाबत रोहित पवारांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा; विरोधकांना इशारा देत म्हणाले…

मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देणार? या प्रश्नावर एकनाथ शिंदे यांनी म्हटलं, “याबाबत ओबीसी शिष्टमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. मराठा समाजाला रद्द झालेलं आरक्षण मिळवून देण्याची जबाबदारी सरकारची आहे. त्यावर कामही सुरू आहे. ओबीसी किंवा अन्य समाजावर अन्याय करणार नाही, अशी भूमिका बैठकीत सरकारकडून मांडण्यात आली.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Cm eknath shinde on maratha and obc reservation ssa

First published on: 29-09-2023 at 20:50 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा