Eknath Shinde Dasara Melava 2022 Updates at BKC Ground : दसऱ्यानिमित्त राज्यात आज (५ ऑक्टोबर) तीन मोठ्या राजकीय नेत्यांचे दसरा मेळावे झाले. यात पहिला मेळावा दुपारी भगवान भक्तीगडावर भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा झाला. त्यानंतर सायंकाळी साडेपाच वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा बीकेसी मैदानावर सुरू झाला. याशिवाय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचाही दसरा मेळावा शिवाजी पार्कवर झाला. शिवसेनेतील बंडखोरीनंतर झालेल्या या दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंसह शिवसेना आणि महाविकासआघाडीवर सडकून टीका केली. वाचा दसरा मेळाव्यातील घडामोडींच्या प्रत्येक अपडेट्स…

व्हिडीओ पाहा…

Live Updates

Eknath Shinde Dasara Melava 2022 Updates : दसऱ्यानिमित्त राज्यात होत असलेल्या दसरा मेळाव्यांच्या अपडेट्स, वाचा प्रत्येक घडामोडीचा आढावा…

14:25 (IST) 5 Oct 2022
ज्या पक्षात कुणीच जात नव्हतं त्या पक्षात गोपीनाथ मुंडे गेले – पंकजा मुंडे

गोपीनाथ मुंडेंना संघर्ष नव्हता का, त्यांच्या वाट्याला कायम संघर्ष आला. त्याकाळात प्रवाहाविरोधात ज्या पक्षात कुणीच जात नव्हतं त्या पक्षात गोपीनाथ मुंडे कमळाचं फुल हातात घेऊन आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत लढले. त्यांचा संघर्ष कमी झाला का? ४० वर्षांच्या राजकारणात केवळ साडेचार वर्षे सत्ता मिळाली. हा संघर्ष कमी आहे का? त्या गोपीनाथ मुंडेंचा संघर्ष आपल्यासमोर आहे – पंकजा मुंडे

14:16 (IST) 5 Oct 2022
मी कधीही कुणासमोर झुकणार नाही – पंकजा मुंडे

माझ्या अंगात हिंदवी स्वराज्याचं स्वप्न बघणाऱ्या छत्रपती शिवरायांचे संस्कार, भगवान बाबा आणि गोपीनाथ मुंडे यांचं रक्त आहे. मी संघर्षाला घाबरत नाही. मी थकणार नाही, कधीही कुणासमोर झुकणार नाही – पंकजा मुंडे

14:12 (IST) 5 Oct 2022
जोडे उचलणाऱ्यांचं कधीच इतिहासाच नाव झालेलं नाही – पंकजा मुंडे

प्रीतम मुंडेंनी सांगितलं की, संघर्ष करो ही घोषणा बंद करा. कुणाला आयुष्यात संघर्ष आला नाही. संघर्षाशिवाय नाव होत नाही. कुणाचे जोडे उचलणाऱ्यांचं कधीच इतिहासाच नाव झालेलं नाही – पंकजा मुंडे

14:09 (IST) 5 Oct 2022
खुर्च्या लावल्या असत्या तर हा मेळावा चारपट झाला असता – पंकजा मुंडे

तुम्ही दाटीवाटीने इथं बसला आहात. खुर्च्या लावल्या असत्या तर हा मेळावा किती मोठा झाला असता. किमान चारपट तरी झाला असता. तुम्ही जमिनीवर बसणं गोड मानलं, मी तुमचे आभार मानते – पंकजा मुंडे

14:07 (IST) 5 Oct 2022
तुम्हाला बसायला खुर्च्यांची व्यवस्था करण्याची माझी ऐपत नाही – पंकजा मुंडे

“हकीकत को तलाश करना पडता हैं, अफवा तो घर बैठे बैठे मिल जाती हैं”. इथं जमलेले लोक ही 'हकीकत' आहे, माझी शक्ती आहे. माझ्याकडे तुम्हाला बसायला द्यायला खुर्च्या नव्हत्या, तुमची व्यवस्था करण्याची माझी ऐपत नाही – पंकजा मुंडे

13:58 (IST) 5 Oct 2022
हा चिखल फेकणाऱ्यांचा नाही, तर चिखल तुडवणाऱ्यांचा मेळावा – पंकजा मुंडे

हा चिखल फेकणाऱ्यांचा नाही, तर चिखल तुडवणाऱ्यांचा मेळावा आहे. चिखल तुडवणं, संघर्ष करणं हे आमच्या रक्तात आहे. जे गोपीनाथ मुंडेंची विरोधक होते, ज्यांनी मला विरोध केला, पातळी सोडून माझ्यावर टीका केली त्यांच्यावर मी बोलले नाही, कधी कुणावर वैयक्तिक आरोप केले नाही, खालच्या पातळीवर टीका केली नाही. कुणी काही चुकलं तर त्या व्यक्तीवर बोलायला संधीचा फायदा घेतला नाही. ते आमच्या रक्तातच नाही – पंकजा मुंडे

13:48 (IST) 5 Oct 2022
पंकजा मुंडे आणि महादेव जानकर नसेल, तर तुमचं खरं नाही – महादेव जानकर

मी काही भाजपाचा माणूस नाही. मी मित्रपक्ष आहे. पंकजा मुंडे आणि महादेव जानकर नसेल, तर तुमचं खरं नाही. म्हणून माझी सुजय विखे आणि प्रीतम मुंडेंना विनंती आहे की, तुम्ही दिल्लीचे खासदार इथं आहात. आमचे शब्द दिल्लीला घेऊन जा, ही विनंती आहे. ही पैसे देऊन आलेली माणसं नाही, पदरमोड करून आलेली माणसं आहेत. मुंबई, गुजरातहून लोकं आलेली आहेत – महादेव जानकर

13:39 (IST) 5 Oct 2022
मोदींना सांगितलं पाहिजे की, पंकजा मुंडेंच्या एका ट्वीटवर लाखो लोक गोळा होतात – महादेव जानकर

महादेव जानकर म्हणाले, “सुजय विखे दिल्लीत असता. त्यांनी मोदींना सांगितलं पाहिजे की, पंकजा मुंडेंच्या एका ट्वीटवर लाखो लोक गोळा होतात. त्यांना या मंत्रिमंडळात स्थान देण्याचा प्रयत्न करावा. असं केलं तर विखेंचाच पक्ष मोठा होणार आहे. प्रीतम मुंडेंनीही तिकडे जाऊन सांगावं की, आम्ही इथं उभे आहोत, तुम्ही दिल्लीतील माणसं आहात. तुम्ही दोघे खासदार आहात.”

13:26 (IST) 5 Oct 2022
खासदार प्रीतम मुंडे, सुजय विखेंसह अनेक राजकीय नेते हजर

भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्यासाठी खासदार प्रीतम मुंडे, खासदार सुजय विखे, शिवाजी कर्डिले, महादेव जानकर यांच्यासह अनेक राजकीय नेते हजर आहेत.

13:21 (IST) 5 Oct 2022
पंकजा मुंडे भगवान गडावर दाखल

पंकजा मुंडे भगवान गडावर दाखल, आरती केल्यानंतर सभेला सुरुवात, थोड्याच वेळात पंकजा मुंडेंची तोफ धडाडणार

दसऱ्यानिमित्त राज्यात राज्यात होत असलेल्या दसरा मेळाव्यांच्या लाईव्ह अपडेट्स, वाचा प्रत्येक घडामोडींचा आढावा…