उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांच्यात पुन्हा मैत्री होईल? फ्रेंडशिप दिनी विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर देणं टाळलं, म्हणाले... | cm eknath shinde press conference after niti aayog meeting friendship with uddhav thackeray rmm 97 | Loksatta

उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांच्यात पुन्हा मैत्री होईल? फ्रेंडशिप दिनी विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर देणं टाळलं, म्हणाले…

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील मैत्री पुन्हा एकदा पाहायला मिळावी, अशी इच्छा शिंदे गटातील काही आमदारांनी व्यक्त केली आहे.

उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांच्यात पुन्हा मैत्री होईल? फ्रेंडशिप दिनी विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर देणं टाळलं, म्हणाले…
संग्रहित फोटो

शिवसेना पक्षात बंडखोरी झाल्यापासून ठाकरे गट आणि शिंदे गटातील वाद चव्हाट्यावर आला आहे. दोन्ही गटातील नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. ठाकरे आणि शिंदे गटाचा वाद आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. असं असलं तरी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील मैत्री पुन्हा एकदा पाहायला मिळावी, अशी इच्छा शिंदे गटातील काही आमदारांनी व्यक्त केली आहे.

याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी थेट उत्तर देणं टाळलं आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात पुन्हा मैत्री पाहायला मिळेल का? असं विचारलं असता मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “फ्रेंडशिप डे हा सर्वांसाठीच असतो. माझ्या सगळ्यांना शुभेच्छा आहेत.” दिल्लीत पार पडलेल्या नीति आयोगाच्या बैठकीनंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी नीति आयोगाच्या बैठकीत कोण-कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली, याची सविस्तर माहिती दिली आहे.

हेही वाचा- “आमच्या कुटुंबावर कितीही अन्याय झाला तरी शिवसेना सोडणार नाही”; सुनील राऊतांची प्रतिक्रिया

राज्यात सध्या शिवसेना आणि भाजपा युतीचं सरकार असून आगामी निवडणुकीत ‘मिशन ४८’ साठी युती मजबुतीने काम करेल. तसेच राज्यातील विविध विकास कामांसाठी १८ हजार कोंटींचे प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. तलाव सुधारण्यासाठी ६०० कोटींचा प्रस्ताव, नवी शहरं उभारणे, कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवणे, राष्ट्रीय शिक्षण धोरण आदी विषयांवर नीति आयोगाच्या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.

हेही वाचा- उदय सामंत यांचे हल्लेखोरांना पुन्हा आव्हान; म्हणाले, “मी तारीख आणि वार…”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी विविध विषयांवर चर्चा झाली असून महाराष्ट्राला जीएसटीचा परतावा लवकरच मिळेल, असंही त्यांनी यावेळी सांगितलं. त्याचबरोबर राज्यातील विविध शाळांमध्ये ‘आपले गुरूजी’ उपक्रम राबवण्यात येणार असून वर्गांमध्ये शिक्षकांचे फोटो लावले जाणार आहेत, असंही एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
उदय सामंत यांचे हल्लेखोरांना पुन्हा आव्हान; म्हणाले, “मी तारीख आणि वार…”

संबंधित बातम्या

“ताई हुशार निघाल्या” म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना भावना गवळींचं प्रत्युत्तर; म्हणाल्या, “माझ्यावर झालेले आरोप…”
“महात्मा गांधींचा जातीभेदावर विश्वास होता”; रणजीत सावरकरांचा गंभीर आरोप; म्हणाले, “सावरकर जेव्हा…”
“गुवाहाटीला जाण्यासाठी शिंदे गटाकडे पैसे कुठून आले?” चार्टर्ड विमानाच्या प्रवासावरून प्रश्नचिन्ह उपस्थित, चौकशीची मागणी
जयंत पाटलांच्या चिरंजीवांच्या शाही विवाहाची लगबग! ; दोन लाख लग्नपत्रिका; अतिभव्य मंडप
“मी राज्यपालांचा आगाऊपणा…” काळ्या टोपीचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचं कोश्यारींवर टीकास्र!

व्हिडिओ

ताज्या बातम्या
सीआरपीएफ जवानाच्या गोळीबारात दोन सहकारी ठार
FIFA World Cup 2022: पोलंडचा सौदी अरेबियावर विजय; लेवांडोवस्कीची चमक
देविकाचा ऑलिम्पिक पदकाचा ध्यास!
India New Zealand ODI Series: सलामीवीरांकडून आक्रमकतेची अपेक्षा!
FIFA World Cup 2022: ऑस्ट्रेलियाची टय़ुनिशियावर मात