scorecardresearch

“आधी माझे कुटुंब, माझी जबाबदारी हीच घोषणा होती; मात्र आमचं ब्रीद….” मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

जाणून घ्या माझे कुटुंब माझी जबाबदारी या घोषणेवरून मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना काय टोला लगावला?

CM Eknath Shinde Taunt to Uddhav Thackeray
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंना उद्देशून काय म्हणाले?

आधी फक्त माझे कुटुंब, माझी जबाबदारी एवढीच घोषणा होती. मात्र आमची घोषणा एवढी मर्यादित आणि संकुचित नाही. आमची घोषणा आहे माझा महाराष्ट्र आणि गतिमान महाराष्ट्र ही आमचंं ब्रीद वाक्य आहे. आम्ही छोटा विचार करत नाही असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. राज्यपालांच्या अभिभाषणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विरोधकांना उत्तर देत आहेत त्यावेळी जाहिरातीचा विषय निघाला असता एकनाथ शिंदे यांनी माझे कुटुंब माझी जबाबदारी या उद्धव ठाकरेंच्या घोषणेची आठवण करून देत त्यांना टोला लगावला.

काय म्हटलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी?

ते जाहिरातीचं जाऊद्या.. आधी फक्त माझे कुटुंब माझी जबाबदारी ही एवढीच घोषणा होती. मात्र आमचं ब्रीद वेगळं आहे. माझा महाराष्ट्र आणि गतिमान महाराष्ट्र हे आमचं ब्रीद आहे. आम्ही मर्यादित आणि संकुचित विचार करत नाही असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.

कायदा सुव्यस्थेची परिस्थिती मविआच्या काळात काय होती?

कायदा सुव्यवस्थेवरून राज्यात काय परिस्थिती होती तुम्हाला माहित आहे. गृहविभाग कसं काम करत होता उद्धव ठाकरेंच्या काळात? हे सगळ्यांना माहित आहे. त्यावेळीही आपण पाहिलंं की काम कसं चालत होतं. साधू हत्याकांड झालं, लष्कराच्या माजी अधिकाऱ्याला मारहाण झाली, जळित कांड झालं, संभाजीनगरच्या दुर्दैवी घटना घडली, मुंबईतल्या साकीनाका भागात दुर्दैवी घटना घडली, शर्जील उस्मान, मनसुख हिरेन कितीतरी प्रकरणं राज्यात उद्धव ठाकरेंच्या काळात घडली काहीही घडलं नाही. आता गुन्ह्यांची नोंद केली जाते,तपास केला जातो आहे. गुन्हेगारांना आळा घालण्याचं काम सरकार करतं आहे असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. हनुमान चालीसा वरून रवी राणा आणि त्यांच्या पत्नीला तुरुंगात धाडलं. कंगनाचं घर सोडलं. गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस यांना अटक करण्याचं षडयंत्र रचलं गेलं होतं. आता आम्ही असं काहीही वागत नाही असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

अनिल देशमुख हे तेव्हा गृहमंत्री होते, त्यांना अनेक गोष्टी ठाऊक आहेत पण मी त्यांना अडचणीत आणणार नाही असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. यावेळी जितेंद्र आव्हाड यांचा मुद्दा निघाला तेव्हा तुम्ही मॉलमध्ये जाऊन माणसांना माराल तर कसं चालेल? असा प्रश्न विचारला तेव्हा जितेंद्र आव्हाडांनी गदारोळ केला. त्यावेळी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आव्हाड यांना शांत केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-03-2023 at 15:30 IST
ताज्या बातम्या