मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थींना फेब्रुवारी महिन्याचा १५०० रुपये लाभ देण्यास आजपासून सुरुवात झाली असून, येत्या दोन – तीन दिवसांत सर्वांच्या बँक खात्यात निधी जमा होणार आहे. मिळणार आहे. शुक्रवार पासून हा लाभ देण्यास सुरुवात झाली.

मार्च महिन्याचे अनुदान जागतिक माहिला दिनी (८ मार्च) दिला जाण्याची अपेक्षा राज्यातील लाखो बहिणींना होती. सामाजिक कल्याण, व अदिवासी विभागाचा दर महिना मिळणारा सहाय्य निधी महिला विकास विभाला न मिळाल्याने हा लाभ दिला गेला नाही.

लाडकी बहीण योजनेतील लाभार्थींना सन्मान निधी देण्यास शुक्रवार पासून सुरुवात होत असल्याचे महिला विकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी समाजमाध्यमावर (एक्स) जाहीर केले. दोन तीन दिवसात हा लाभ राज्यातील पात्र लाडक्या बहीणींच्या बँक खात्यात जमा होईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

या योजनेतील लाभार्थींना सन्मान लाभ देण्यास महिन्याला ३,६०० कोटी रुपये लागतात. हा निधी मिळावा यासाठी महिला विकास विभागाला दर महिन्याला वित्त विभागाकडे प्रस्ताव सादर करावा लागतो. महिला विकास, सामाजिक न्याय, आणि आदिवासी विकास विभाग असा तीन विभागांचा मिळून हा निधी उभा केला जातो.

२३ फेब्रुवारी पासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झाले. सहा मार्च रोजी सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात या योजनेसाठी २८ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तोपर्यंत फेब्रुवारी महिन्याच्या लाभाची रक्कम जमा झाली नव्हती. राज्यातील लाडक्या बहीणींची संख्या दोन कोटी ५३ हजार जाहीर झाली होती. त्याची पडताळणी सुरु असून ही संख्या दर महिन्याला कमी होत आहे.

मार्च अखेर पर्यंत शेवटची पडताळणी होणार आहे. त्यानंतर राज्यातील पात्र लाडक्या बहीणींची संख्या निश्चित होणार आहे. ५० ते ६० लाख लाडक्या बहीणी अपात्र ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिल्लक दोन कोटी लाडक्या बहीणींसाठी वर्षाला ३० ते ३२ हजार कोटी रुपये लागणार आहेत.

महिला विकास विभागाचे २८ हजार कोटी आणि सामाजिक व आदिवासी विभागाकडून मिळणारा १३ व ७ टक्के निधीवर लाडक्या बहीणींचा लाभ एप्रिल पासून दर महिन्याला बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.