cm uddhav thackeray attacks amit shah in mumbai ssa 97 | Loksatta

“कितीही अफजल खान आले तरी…”; उद्धव ठाकरेंची अमित शाहांवर टीका

Uddhav Thackeray On Amit Shah : सर्वोच्च न्यायालयात शिवसेना कोणाची यावर सुनावणी सुरु आहे. त्यात आता उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे.

“कितीही अफजल खान आले तरी…”; उद्धव ठाकरेंची अमित शाहांवर टीका
अमित शाह उद्धव ठाकरे ( संग्रहित छायाचित्र )

राज्यातील सत्तासंघर्ष, आमदार अपात्रता आणि खरी शिवसेना कोणाची, मुद्द्यांवर सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठाकडे सुनावणी सुरु आहे. त्यात आता शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर हल्ला केला आहे. मला आई भवानी, न्यायदेवतेवर विश्वास आहे. विजय आपलाच होणार आहे. कितीही अफजल खान आले तरी घाबरणार नाही, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली आहे.

उस्मानाबाद येथून आलेल्या कार्यकर्त्यांनी मातोश्रीवर शिवबंधन बांधलं. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना संबोधित केलं. तेव्हा आमदार कैलास पाटील, खासदार ओमराजे निंबाळकर उपस्थित होते.

हेही वाचा – विश्लेषण : शिवसेना वि. शिंदे गट वादात १९७२ च्या ‘त्या’ प्रकरणाचा दिला जातोय संदर्भ; नेमका काय होता ‘सादिक अली वि. निवडणूक आयोग’ खटला?

“आई भवानीचा आशीर्वाद असल्यावर कितीही अफजल खान आले तरी घाबरणार नाही. दसऱ्याला आपण भेटणार आहोत. एक चांगली सुरूवात झाली आहे. न्यायालयात दुसरी केस सुरु आहे. माझा आई भवानीवर आणि सर्वोच्च न्यायालयावर विश्वास आहे. न्याय आपल्याला मिळणार,” असा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला आहे.

“खच्ता खाऊन मोठे केले, ते खोक्यात गेले”

“तुळजाभवानीच्या दर्शनाला मी येणारच आहे. मला धाराशिव जिल्ह्याचे कौतुक करायचं आहे. कारण कैलासने काय पराक्रम केलं सर्वांना माहिती आहे. ओमराजे देखील कसा रक्त पाळतोय हे तुम्ही देखील पाहिलं आहे. जिथे लोकप्रतिनिधी घट्ट आहेत, तिथे शिवसैनिक घट्ट राहणारचं. ज्यांना तुम्ही खच्ता खाऊन मोठे केले, ते खोक्यात गेले,” असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर केला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
“राज्यातील काही दूध संघांनी सरकारच्या अनुदानात अपहार केला, आता…”, मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा गंभीर आरोप

संबंधित बातम्या

VIDEO: “शेळीने उंटाचा मुका…”, ‘सभा उधळून लावू’ म्हणणाऱ्या मनसे नेत्याला सुषमा अंधारेंचं प्रत्युत्तर
Maharashtra Karnataka Dispute : शरद पवारांच्या ४८ तासांच्या अल्टिमेटमवर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले…
VIDEO: ‘अपना एक स्टाईल है, इलाका तुम्हारा और धमाका हमारा’, मनसेच्या इशाऱ्यावर सुषमा अंधारेंचं प्रत्युत्तर, म्हणाल्या…
पार्श्वगायिका सुहासिनी नांदगावकर यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश
Maharashtra Karnataka Border Dispute : “हा संपूर्ण विषय मी अमित शाहांच्या कानावर घालणार आहे, कारण…”; देवेंद्र फडणवीसांचं विधान!

व्हिडिओ

ताज्या बातम्या
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद तापला!
कर्नाटकने डिवचले तरीही, जतमधील राजकारणी श्रेयवादात दंग
राज्यात पाच हजार बायोगॅस संयंत्रे उभारणार; केंद्राच्या योजनेचा कोल्हापूर, पुणे, नगरला सर्वाधिक लाभ
India Bangladesh ODI Series: भारताला विजय अनिवार्य!
रेशीम उद्योगातून उन्नतीचा ‘धागा’!; अमरावतीत विदर्भातील पहिला रेशीम बाजार