नवी मुंबईतील खारघर येथील फुटबॉल महाराष्ट्र सेंटर ऑफ एक्सलन्सचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे झाले. या सेंटरमुळे जागतिक पातळीवर नावलौकिक मिळविणारा भारताचा संघ तयार होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी मंत्री एकनाथ शिंदे, आदित्य ठाकरे, आदिती तकटरे आणि राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि सिडकोचे अधिकारी उपस्थित होते.

“आजचा हा माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण आहे. मुख्यमंत्री आणि मंत्री म्हटल्यानंतर राज्यासाठी कामे करणे येतेच. पण ही रस्ते, पाणी आणि इतर कामे करत असताना आपण एका गोष्टीकडे नेहमी दुर्लक्ष करतो असं मला नेहमी वाटतं. जगावं कसं हेच आपण विसरून जातो. जगण्यासाठी खेळाची गरज आहे. हल्ली मैदानी खेळ मागे पडत चालले होते त्यांना आपण प्रोत्साहन देत आहोत. आयटी क्षेत्रामध्ये विकास होत असताना आपण आपल्या मातीपासून दूरावत चाललो आहोत. त्यामुळे आता आपण ज्या मातीपासून आपलं नातं तुटतं चाललं होतं ते आता आपण पुन्हा जोडतो आहोत,” असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

chennai super kings vs kolkata knight riders match preview
IPL 2024 : विजयी पुनरागमनासाठी चेन्नई सुपर किंग्ज उत्सुक! आज अपराजित कोलकाताचे आव्हान; कर्णधारांच्या कामगिरीकडे लक्ष 
Rameshwar Cafe Bomb blast
Bengaluru: रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी भाजपा कार्यकर्त्याला अटक, संशयितांशी संबंध असल्याचा दावा
kl rahul
विजयाचे खाते उघडण्यास लखनऊ उत्सुक! ‘आयपीएल’मध्ये आज पंजाब किंग्जचे आव्हान
License refused for lack of parking facility The High Court said there is no such rule
पार्किंगची सोय नाही म्हणून परवाना नाकारला, उच्च न्यायालय म्हणाले, असा काही नियम नाही…

“आपल्या पिढीमध्ये क्रिकेडचे वेड होते. पण आता फुटबॉलचे प्रेम आणि आवड फार झपाट्याने वाढत चालली आहे. माझ्या सर्व सहकाऱ्यांनी हे वाढणारे वेळ ओळखून ही सुविधा निर्माण केली आहे. एखादी जागा मोकळी आहे म्हटल्यावर पटकन तिथे विकासक येऊन टॉवर बांधून मोकळा झाला असता. पण तसे होऊ दिले नाही. मी म्हटल्याप्रमाणे आरोग्यदायी जीवनासाठी या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत,” असे उद्धव ठाकरे म्हणाले.

“सगळ्या खेळांच्या सुविधा एका ठिकाणी उपलब्ध करुन देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असेल. आमच्यावेळी गल्लीमध्ये क्रिकेट खेळाचे ते कधी मेन रोडवर आलेच नाही. माझ्या वेळेच्या अनेकांना वाटायचं की आपण क्रिकेटपटू व्हावं पण संधी नव्हती. मी स्वतः तेजस ठाकरे यांच्यासोबत परदेशातल्या फुटबॉल सामन्यासाठी गेलो होतो. त्यावेळी स्टेडियमध्ये मी आणि फक्त रेफरीचं (पंच) निष्पक्ष होतो. कारण मला आजही फुटबॉलमधले काहीच कळत नाही. फुटबॉल हा पायाने खेळायचा जरी खेळ असला तरी त्याच्यामध्ये डोकं वापरावं लागतं. इतक्या वेगाने हा खेळ खेळावा लागतो आणि त्यासाठी वेगानेच विचार करावा लागतो. माझी इच्छा अशी आहे की, फुटबॉलच्या वर्ल्डकपमध्ये भारताचा संघसुद्धा या स्टेडियममधून दरारा निर्माण करणारा व्हायला पाहिजे. प्रफुल्ल पटेल आणि त्यांची टीम कधी अर्धवट काम करणार नाही याची मला खात्री आहे आणि त्या कामाला सरकार नुस्ती मदत नाही तर प्रोत्साहन दिल्याशिवाय राहणार नाही. फुटबॉलमधले जास्त काही कळत नसल्यामुळे उगाच काही अज्ञान प्रकट करु इच्छित नाही,” असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.