scorecardresearch

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा उद्या दिल्ली दौरा; बैठकीकडे सर्वांचं लक्ष

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या दिल्ली दौऱ्यावर असणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे राजकीय जाणकारांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Uddhav-Thackeray
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा उद्या दिल्ली दौरा; बैठकीकडे सर्वांचं लक्ष (संग्रहित फोटो)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या दिल्ली दौऱ्यावर असणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे राजकीय जाणकारांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान नक्षलग्रस्त जिल्ह्याच्या राष्ट्रीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीला उद्धव ठाकरे हजेरी लावणार आहे. दरम्यान गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबतही बैठक होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

मुख्यमंत्री सकाळी ६ वाजून १५ मिनिटांनी वर्षा निवासस्थानावरून दिल्लीला जाण्यासाठी निघणार आहेत. ६ वाजून ४० मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दिल्लीला प्रयाण करतील. दिल्लीला ९ वाजता पोहोचतील. त्यानंतर ९.५० मिनिटांनी गाडीने विज्ञान भवन येथे जाणार आहे. तिथे सकाळी १० वाजता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली सुरक्षा आणि विकास या दोन मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. बैठक संपल्यानंतर दुपारी २ वाज विज्ञान भवन येथून गाडीने महाराष्ट्र सदनाकडे येतील. त्यानंतर ३ वाजून २० मिनिटांनी दिल्लीवरून मुंबईला निघतील, असा दौरा निश्चित आहे. सध्या महाराष्ट्रामधील गडचिरोली आणि चंद्रपूरसारख्या भागांमध्ये नक्षलवादाची समस्या प्राकर्षाने दिसून येत आहे. या भागांमध्ये विकास कामांना गती देण्यास केंद्राचे तसेच राज्याचे प्राधान्य आहे. मात्र आता नक्षलवादाची समस्या मोठ्या शहरांमध्ये निर्माण होऊ शकते अशी भीती गुप्तचर यंत्रणांनी व्यक्त केली असल्याने या गंभीर मुद्द्यावर केंद्र आणि राज्यांनी एकत्र काम करण्याची गरज असून पुढील वाटचाल कशी असावी यासंदर्भात चर्चा करण्यासाठी केंद्राकडून राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दिल्लीत बोलावण्यात आलं आहे.

“आम्हाला पुन्हा संधी मिळणार आहे, तेव्हा…”, देवेंद्र फडणवीसांचं नवी मुंबईत वक्तव्य!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीही दिल्ली दौरा केला होता. यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अशोक चव्हाण होते. तेव्हा पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बंद दाराआड चर्चा झाली होती. तेव्हा भाजपा आणि शिवसेना युतीच्या चर्चांना उधाण आलं होतं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-09-2021 at 22:00 IST

संबंधित बातम्या