राज्यामध्ये मागील आठ दिवसांपासून सुरु असणाऱ्या सत्तासंघर्षानंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेनं दाखल केलेल्या बहुमत चाचणीविरोधातील याचिकेवर सुनावणी करताना शिवसेनेविरोधात निकाल दिल्यानंतर लगेचच मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिलाय. मला मुख्यमंत्री पद सोडण्याची खंत अजिबात नाहीय, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला. मुख्यमंत्री राजीनामाच्या भाषणात नेमकं काय म्हणाले आहेत पाहूयात…

मी आश्वस्त केले होतं जे सुरु केलंय ते सुरु राहील. आता पर्यंतची वाटचाल तुमच्या मदतीने. सरकार म्हणून अनेक कामे केली आहेत. बळीराजाला कर्जमुक्त केले. मला समाधान वाटते आहे. आयुष्य सार्थकी लागले संभाजीनगर नामकरण झाले. शिवाय आज उस्मानाबादचे धाराशिव झाले. सरकारी कर्मचाऱ्यांना हक्काची जागा त्यांना दिली. एखादी गोष्ट चांगली सुरु असली की दृष्ट लागते तसं झालं. पवारसाहेब, सोनियाजी सहकार्यांना धन्यवाद देतो. चारच शिवसेनेचे मंत्री आज मंत्रीमंडळाच्या बैठकीला होते. आम्ही जेव्हा नामकरणाचा प्रस्ताव मांडला तेव्हा त्याला कुणीही विरोध केला नाही. ज्यांनी करायचे होये ते नामानिराळे ज्यांचा विरोध भासवला त्यांनी समर्थन दिलं.

article about conspiracy to defame the judiciary constitution protection by judiciary
लेख : न्यायपालिकेच्या बदनामीचे षड्यंत्र!
gurmeet ram rahim
“राम रहीमला पॅरोल देण्यापूर्वी…”, उच्च न्यायालयाचा हरियाणा सरकारला दणका; म्हणाले, “तुम्ही अशा किती गुन्हेगारांना…”
Death threat to Deputy Chief Minister devendra Fadnavis on social media case filed in Santacruz police station
उपमुख्यमंत्री फडणवीस यांना समाज माध्यमांवर ठार मारण्याची धमकी, सांताक्रुझ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Supreme Court issues contempt notice to Patanjali Ayurved
“तुमची औषधं सर्वोत्तम हा दावा कशाच्या आधारे करत आहात?” सर्वोच्च न्यायालयाने पतंजलीला सुनावले खडे बोल!

अनेकांना शिवसैनिकांना शिवसेनाप्रमुखांनी मोठे केले. ज्यांना मोठे केले तेच आज विसरले. जे देणे शक्य होते ते सगळं दिलं. मातोश्रीला अनेक लोक येऊन पाठिंबा देतायत. ज्यांना दिलं ते नाराज ज्यांना काहीच मिळाले नाही ते सोबत हीच शिवसेना सामान्यांच्या पाठिंब्याने सुरु आहे.

न्यायदेवतेने निकाल दिलाय. बहुमत चाचणी करण्याचा जो निर्णय दिलाय. राज्यपालांनी २४ तासात लोकशाहीचे पालन केले त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. पण १२ विधानपरिषद आमदारांच्या यादीवरही आता निर्णय घ्यावा. मंत्रिमंडळ बैठकीत अशोकराव म्हणाले, आम्ही बाहेर पडतो. बाहेरुन पाठिंबा देतो. पण त्यांना परत यायला सांगा. काल पण आवाहन केले मी, तुमची नाराजी कोणावर आहे? ती सुरतला, गुवाहटीला जाऊन सांगण्यापेक्षा ‘मातोश्री’समोर येऊन बोलला असता. मला समोरासमोर चर्चा हवीय. त्यांच्याशी मला वाद नकोय.

मुंबईत बंदोबस्त वाढवला स्थानबध्द करत नोटीस आल्या. चीन सीमेवरील सुरक्षा कदाचित मुंबईत तैनात केली जाईल. इतकं का नातं तोडलं?. कुणीही शिवसैनिकांनी यांच्यामध्ये येऊ नये. नवीन लोकशाहीचा पाळणा हलणार आहे. मी सांगतो तुमच्यामध्ये कुणी येणार नाही. किती आमदार आहे? लोकशाहीत डोकी फक्त मोजण्यासाठी आहोत की काम करण्यासाठी? माझ्या विरोधात एक जरी उभा झाला तर मला ते लाजिरवाणे आहे. मला उद्याचा खेळच करायचा नाही. शिवसेनाप्रमुखांच्या पुत्राला खेचण्याचे पुण्य त्यांच्या पदरी पडू द्या. त्यांचा आनंद मला हिसकावून घ्यायचा नाही.

पाहा व्हिडीओ –

आम्ही हपालेले होऊन जात नाही. मुंबई आणि भारतासाठी झटतोय. सगळ्यांसमोर मी मुख्यमंत्री पदाचा त्याग करतो आहे. मी घाबरणारा नाही. उद्या त्यांचा आनंदाचा दिवस आहे. त्यांना पेढे खाऊ द्या. मला शिवसैनिकांच्या प्रेमाचा गोडवा हवाय. वारकरी म्हणतात उध्दव ठाकरेंच्या हस्ते आषाढीची पूजा हवीय. माऊली म्हणतील ते मान्य. महाराष्ट्रात दंगल झाली नाही मुस्लीमांनी पण ऐकले. मी या पदावर आलोच अनपेक्षितपणे जातो पण तसाच आहे.

नव्याने शिवसेना भवनात बसणार आहे. शिवसेना हिरावून घेऊ शकत नाही. मी मुख्यमंत्री पदासोबत विधानपरिषद सदस्यात्वाचा पण राजीनामा देत आहे. मी पुन्हा येईन असं बोललो नव्हतो. सर्वांचे शासकीस कर्मचारी सहकार्यांचे आभार.