नगर : शहराच्या श्रमिकनगर भागातील श्री श्रमिक बालाजी मंदिराच्या २९ व्या वार्षिक महोत्सवानिमित्त (ब्रह्मोत्सव) ‘श्री व्यंकटेश्वरला कल्याणम’ (बालाजी विवाह) सोहळा थाटात साजरा करण्यात आला. श्री श्रमिक बालाजी सामाजिक संस्थेच्या वतीने सव्वा रुपयात १० जोडप्यांचा सामुदायिक विवाह लावण्यात आला. या वेळी शहरातील प्रतिष्ठित नागरिक व भाविक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. ब्रह्मोत्सवात आतापर्यंत १८० सामुदायिक विवाह लावण्यात आले आहेत. विवाहापूर्वी श्रमिकनगर परिसरातून भगवान बालाजी पालखी (वरात) मिरवणूक वाद्यांसह काढण्यात आली.

मिरवणुकीत महिला भजनी मंडळ टाळ घेऊन सहभागी झाले होते. ठिकठिकाणी पालखीचे स्वागत करून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. श्री व्यंकटेश वरला कल्याणमसाठी (लग्न) उदय भणगे, श्रीनिवास बोज्जा, सतीश पागा यांनी सपत्नीक विधिवत पूजा करून बालाजी विवाह लावला. संपूर्ण परिसर ‘श्रीमन व्यंकटरमना गोिवदा गोिवदा’च्या जय घोषाने दुमदुमला होता. विवाह सोहळय़ासाठी जिल्ह्यासह राज्याबाहेरून भाविक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Ram Navami, High Court, State Govt,
रामनवमीला खबरदारी घ्या! उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश
Kolhapur Police arrest gang selling fake notes
बनावट नोटांची छपाई, विक्री करणारी टोळी कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात; म्होरक्याचे नेत्यांशी लागेबांधे असल्याची चर्चा
koradi police station, Nagpur, case registered, Sexual abuse, minor girl
धक्कादायक! नागपूरात नऊ महिन्यांपासून अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण
(11 goats died in attack by stray dogs in Jalgaon )
जळगावात मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात ११ बकर्‍या मृत्युमुखी

या वेळी बालाजी मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई केली होती. आमदार संग्राम जगताप, महापौर रोहिणी शेंडगे, उपमहापौर गणेश भोसले, नगरसेवक मनोज दुल्लम, धनंजय जाधव, उदय कराळे, नगरसेवक सुनील त्र्यंबके, सतीश शिंदे आदी उपस्थित होते. विवाह सोहळय़ानंतर महाआरतीने महोत्सवाची सांगता झाली. वार्षिक महोत्सव यशस्वी करण्यासाठी विनोद म्याना, अशोक इप्पलपेल्ली, राजू येमूल, लक्ष्मण आकुबत्तीन, दत्तात्रय कुंटला, राजू गड्डम, कैलास लक्कम आदींसह विश्वस्तांनी परिश्रम घेतले.