सव्वा रुपयात सामुदायिक विवाह ; दहा जोडप्यांची लग्नगाठ

विवाहापूर्वी श्रमिकनगर परिसरातून भगवान बालाजी पालखी (वरात) मिरवणूक वाद्यांसह काढण्यात आली.

सव्वा रुपयात सामुदायिक विवाह ; दहा जोडप्यांची लग्नगाठ
शहरातील श्रमिकनगर भागातील श्री श्रमिक बालाजी मंदिराच्या वार्षिक महोत्सवात श्री व्यंकटेश्वरला कल्याणम सोहळा मोठय़ा थाटात साजरा करण्यात आला.

नगर : शहराच्या श्रमिकनगर भागातील श्री श्रमिक बालाजी मंदिराच्या २९ व्या वार्षिक महोत्सवानिमित्त (ब्रह्मोत्सव) ‘श्री व्यंकटेश्वरला कल्याणम’ (बालाजी विवाह) सोहळा थाटात साजरा करण्यात आला. श्री श्रमिक बालाजी सामाजिक संस्थेच्या वतीने सव्वा रुपयात १० जोडप्यांचा सामुदायिक विवाह लावण्यात आला. या वेळी शहरातील प्रतिष्ठित नागरिक व भाविक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. ब्रह्मोत्सवात आतापर्यंत १८० सामुदायिक विवाह लावण्यात आले आहेत. विवाहापूर्वी श्रमिकनगर परिसरातून भगवान बालाजी पालखी (वरात) मिरवणूक वाद्यांसह काढण्यात आली.

मिरवणुकीत महिला भजनी मंडळ टाळ घेऊन सहभागी झाले होते. ठिकठिकाणी पालखीचे स्वागत करून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. श्री व्यंकटेश वरला कल्याणमसाठी (लग्न) उदय भणगे, श्रीनिवास बोज्जा, सतीश पागा यांनी सपत्नीक विधिवत पूजा करून बालाजी विवाह लावला. संपूर्ण परिसर ‘श्रीमन व्यंकटरमना गोिवदा गोिवदा’च्या जय घोषाने दुमदुमला होता. विवाह सोहळय़ासाठी जिल्ह्यासह राज्याबाहेरून भाविक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

या वेळी बालाजी मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई केली होती. आमदार संग्राम जगताप, महापौर रोहिणी शेंडगे, उपमहापौर गणेश भोसले, नगरसेवक मनोज दुल्लम, धनंजय जाधव, उदय कराळे, नगरसेवक सुनील त्र्यंबके, सतीश शिंदे आदी उपस्थित होते. विवाह सोहळय़ानंतर महाआरतीने महोत्सवाची सांगता झाली. वार्षिक महोत्सव यशस्वी करण्यासाठी विनोद म्याना, अशोक इप्पलपेल्ली, राजू येमूल, लक्ष्मण आकुबत्तीन, दत्तात्रय कुंटला, राजू गड्डम, कैलास लक्कम आदींसह विश्वस्तांनी परिश्रम घेतले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Community marriages at 1 25 rupee in shri shramik balaji temple zws

Next Story
मुख्यमंत्र्यांच्या दौरा अन् नांदेडात शिवसेनेला खिंडार ; जिल्हाप्रमुख उमेश मुंडे यांच्यासह अनेक पदाधिकारी शिंदे गटात जाणार
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी