माध्यमिक शिक्षक सोसायटी सभेत गोंधळ

जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीची ऑनलाइन वार्षिक सभा गोंधळाच्या वातावरणात पार पडली.

जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीची ऑनलाइन सभा सुरु होण्यापूर्वी विरोधी परिवर्तन मंडळाच्या संचालकांनी काळ्या फिती लावून सत्ताधाऱ्यांचा निषेध केला.

विरोधी संचालकांकडून काळ्या फिती लावून निषेध

नगर : जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीची ऑनलाइन वार्षिक सभा गोंधळाच्या वातावरणात पार पडली. लाभांश कमी दिल्याने सत्ताधाऱ्यांचा परिवर्तन मंडळाच्या विरोधी संचालक अप्पासाहेब शिंदे, बाबासाहेब बोडखे, महेंद्र हिंगे, वसंत खेडकर अंबादास राजळे, सुनील दानवे आदींनी निषेध नोंदवला.

सत्ताधाऱ्यांवर मनमानी कारभाराचा आरोप करत विरोधी संचालक दंडाला काळ्या फिती बांधून सभेत सहभागी झाले होते. करोनाच्या पाश्र्?वभूमीवर माध्यमिक शिक्षक सोसायटीची सभा काल, सोमवारी ऑनलाइन झाली.

सभा सुरु होण्यापूर्वी विरोधी संचालकांनी सत्ताधाऱ्यांच्या कारभाराचा निषेध नोंदवून निदर्शने केली. संचालक मंडळाने मागील वर्षीपेक्षा ५ टक्के कमी म्हणजे, ९ टक्के लाभांश देऊन सभासदांचा विश्वासघात केल्याचे अप्पासाहेब शिंदे यांनी म्हटले आहे. निवडणुका आल्या की लाभांश वाढवून द्यायचा आणि निवडणुका संपल्या की लाभांश कमी करायचा, अशी फसवाफसवी सत्ताधारी करतात, दरवर्षी जागा खरेदी, बांधकामावर लाखो रुपये खर्च होतात. आता पुढील वर्षांत जागा खरेदी न करता मयत सभासदांचे पैसे परत करावेत, अशी मागणी ‘परिवर्तन‘ने केली.

जामीन कर्ज मर्यादा २० लाख करा, या सभासदांच्या मागणीचा विचार न करता किरकोळ खर्च, उद्घाटने, छपाई, जाहिरात, दुरुस्ती आदींवर वारेमाप खर्च करून सभासदांच्या खिशाला कात्री लावण्याचे काम संचालक मंडळ आहे. नोकर भरती, शाखा ऑनलाइन करणे, कर्मचारी बढती आदी प्रश्न विरुद्ध संचालकांनी सभेत उपस्थित केले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Confusion secondary teachers society meeting ssh