महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून आज दुपारी बोर्डाच्या बारावीच्या परीक्षांचे निकाल जाहीर केले. यानुसार राज्याचा यंदाचा निकाल ९९.६३ टक्के लागला आहे. करोना काळामध्ये निर्माण झालेल्या अभूतपूर्व परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. त्यानुसार अंतर्गत मूल्पमापनाच्या आधारावर विद्यार्थ्यांचं मूल्यांकन करून हे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. त्यानुसार राज्यात कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९९.८१ टक्के लागला असून सर्वात कमी निकाल औरंगाबादचा ९९.३४ टक्के इतका लागला आहे.

संध्याकाळी ४ वाजता राज्य शिक्षण मंडळाकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या संकेतस्थळांवर हे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. या वेबसाईट्सवर मंडळाकडून प्रत्येक विद्यार्थ्याला देण्यात आलेल्या रोल नंबरनुसार निकाल पाहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.

कुठे पाहाल निकाल?

https://hscresult.net

11admission.org.in

https://msbshse.co.in

maharesult.nic.in

hscresult.mkcl.org

दरम्यान, आपल्या निकालावर जर कोणत्या विद्यार्थ्याला आक्षेप असेल, आपल्या गुणांविषयी तक्रार असेल, तर त्यासंदर्भात तक्रार निवारणासाठीचं व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यानुसार, राज्य शिक्षण मंडळाकडून विभागीय मंडळाच्या स्तरावर अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. विद्यार्थ्यांना तक्रार नोंदवण्यासाठी टपाल, ई मेल किंवा व्यक्तिश: तक्रार नोंदवता येईल. त्यासाठीच्या अर्जाचा नमुना, तक्रारींचे निराकरण करण्यासाठीच्या अधिकाऱ्यांची नावे, संपर्क क्रमांक, ई मेल पत्ता आदी माहिती राज्य मंडळाने संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे. तक्रारीचा अर्ज केल्यानंतर दहा दिवसांत त्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल.

कुणाला आणि कसा कराल संपर्क?

पुणे विभाग

प्रिया शिंदे, सहसचिव
मोबाईल – 9689192899
मेल आयडी – sscboardpune@gmail.com

नागपूर विभाग

माधुरी सावरकर, सहसचिव
मोबाईल – 9403614142
मेल आयडी – msboardnagpur@gmail.com

औरंगाबाद विभाग

राजेंद्र पाटील, सहसचिव
मोबाईल – 9922900825
मेल आयडी – chair.aurboard@mahedu.gov.in

मुंबई विभाग

मुश्ताक शेख, सहसचिव
मोबाईल – 7020014714
मेल आयडी – sschsc.mumbaiboard@gmail.com

कोल्हापूर विभाग

देविदास कुलाळ, सहसचिव
मोबाईल – 7588636301
मेल आयडी – divsec.kop@gmail.com

अमरावती विभाग

जयश्री राऊत, सहसचिव
मोबाईल – 9960909347
मेल आयडी – divsecamt@rediffmail.com

नाशिक विभाग

एम. यु. देवकर, सहसचिव
मोबाईल – 8888339423
मेल आयडी – nsksec@rediffmail.com

लातूर विभाग

संजय पंचगल्ले, सहसचिव
मोबाईल – 9421694282
मेल आयडी – divsecretarylatur@gmail.com

कोकण विभाग

भावना राजनोर, सहसचिव
मोबाईल – 8806512288
मेल आयडी – divchairman.konkan@gmail.com

 

राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भात ट्वीट करून माहिती दिली आहे.