राजीनामा देण्यापूर्वी मुख्यमंत्रीपदावर असताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय घेतले. त्यांनी राज्यातील औरंगाबाद, तसेच उस्मामानाबाद शहरांच्या नामांतराच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. दरम्यान, या नामांतरच्या मुद्द्यावरुन वेगवेगळी मते व्यक्त केली जात आहेत. एमआयएम पक्षाने तर (Aurangabad)औरंगाबाद शहराच्या संभाजीनगर तसेच उस्मानाबाद शहराच्या धाराशीव या नामकरणाला स्पष्ट विरोध दर्शविला आहे. दरम्यान, काँग्रेस हायकमांडदेखील या निर्णयावर नाराज असल्याचे म्हटले जात आहे. याबद्दल बोलताना नामांतराचा प्रश्न नाही, पण शिवसेनेने (Shivsena) विश्वासात घ्यायला हवे होते, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नसीम खान यांनी दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> Maharashtra Cabinet | एकनाथ शिंदेंच्या मंत्रिमंडळात भाजपाला २५ मंत्रीपदे? शिंदे गटाच्या वाट्याला किती?

एबीपी माझा या वृत्तवाहिनीने याबाबत सविस्तर वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार, “संभाजी महाराजांबद्दल काँग्रेस पक्षाला आदर आहे. महाविकास आघाडीचे सरकार २०१९ मध्ये स्थापन झाले. या आघाडीचा किमान समान कार्यक्रम होता. शिवसेनेसारख्या पक्षाला काँग्रेस पक्षाने आपले बाकीचे विषय बाजूला सोडून समर्थन देण्याचा निर्णय घेतला. भारतीय पक्षाला बाजूला सारण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. तसेच काँग्रेस हायकमांडनेही त्याला मंजुरी दिली होती. त्यानंतर लेखी किमान समान कार्यक्रम तयार करण्यात आला होता. शरद पवार यांनी याबाबत पुढाकार घेतला होता. शिवसेनेने अचानक निर्णय घेण्याऐवजी विश्वासात घ्यायला हवे होते. चर्चा व्हायला हवी होती. हे सरकार तीन पक्षाचे होते लोकशाही पद्धतीने चर्चा व्हायला हवी होती,” असे नसीम खान म्हणाले आहेत.

हेही वाचा >>> शिवसेना म्हणजे भरकटलेलं जहाज, बेताल वक्तव्ये करणारे प्रवक्तेच शिल्लक राहणार- राधाकृष्ण विखे पाटील

तसेच, “प्रत्येक विषयावर काँग्रेस पक्षाची एक विचारधारा आहे. आम्ही सर्व धर्मसमभाव मानतो. आम्ही सर्वच महापुरुषांचा आदर करतो. विरोधाचा विषय नसून कार्यपद्धतीचा विषय आहे,” असेदेखील नसीम खान म्हणाले. तसेच, अनेक विषय आहेत. ज्या प्रकारे हे विषय घडले आहेत, त्याबद्दल हायकमांड नाराज आहे. त्याची दखल हायकमांडने घेतली असून येणाऱ्या काळात काय निर्णय घेतला जाईल ते आगामी कळात दिसेलच, अशी माहिती नसीम खान यांनी दिली.

हेही वाचा >>> “आदित्य ठाकरेंना सुरतला पाठवतो असं मुख्यमंत्री म्हणाले, त्यावेळी…”; संजय राऊतांसंदर्भात आमदाराचा खळबळजनक दावा

पुढे बोलताना, विधानपरिषदेच्या निवडणुकीदरम्यान झालेली मतफुटी तसेच महाविकास आघाडी सरकार असताना घेण्यात आलेल्या निर्णयांबद्दल काँग्रेसची काय भूमिका असेल, यावरही नसीम खान यांनी भाष्य केले. काँग्रेसमध्ये पक्षापेक्षा कोणाही मोठा नाही. पक्षाची विचारधारा, महापुरुषांबद्दल असलेली बांधिलकी यांच्या वर कोणताही नेता मोठा नाहीये. काही चुकीचं घडत असेल तर हायकमांड निश्चितपणे निर्णय घेईल, असे नसीम खान म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress high command upset over aurangabad city name change into sambhaji nagar said naseem khan prd
First published on: 07-07-2022 at 16:39 IST