देशातील महागाई आणि ईडीच्या कारवाईवरून काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. युपीएच्या कार्यकाळात देशात अनेक महत्त्वाची कामे झाली. मात्र, आता देशात एक प्रकारचे दहशतीचे वातावरण असून विरोधकांचं आवाज बंद करण्याचे काम सुरू आहे आणि महागाई प्रचंड वाढली आहे, असं ते म्हणाले. तसेच त्यांनी यावेळी ९ ते १५ ऑगस्ट दरम्यान काँग्रेसतर्फे ‘स्वातंत्र्याचा गौरव’ ही पदयात्रा काढण्यात येणार असल्याचीही त्यांनी दिली.

हेही वाचा – “चंद्रकांत खैरेंच्या डोक्यावर परिणाम झालाय” बंडखोर आमदार संजय शिरसाटांची बोचरी टीका!

Uddhav Thackeray, Mahayuti, campaign,
उद्धव ठाकरे यांना आयतेच कोलीत
PM Modi, Manipur, PM Narendra Modi,
मोदीजी म्हणतात, मणिपूरप्रश्नी वेळीच हस्तक्षेप केला… खरंच?
Sharad Pawars appeal to the youth to question to government regarding jobs and employment
आश्वासन वर्षाला दोन कोटी रोजगारांचे, प्रत्यक्षात नऊ वर्षांत सात लाखच नोकऱ्या; सरकारला जाब विचारण्याचे शरद पवार यांचे तरुणाईला आवाहन
Kirit Somaiya shinde fadnavis
“या सरकारमध्येही घोटाळा होणार होता, पण…”, सोमय्यांचा शिंदे-फडणवीसांना घरचा आहेर; भाजपावरही आरोप

“युपीएच्या कार्यकाळात अनेक महत्त्वाची कामे झाली. यामध्ये महाराष्ट्राने देशाला दिलेली देणगी म्हणजे रोजगार हमी कायदा, माहितीचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार, अन्न सुरक्षा कायदा, भूसंपादन यासारख्या अनेक महत्त्वाचे कायदे मनमोहन सिंह यांच्या नेतृत्त्वा या देशात लागू करण्यात आले. मात्र, आता काळ बदललेला आहे. देशात एक प्रकारची दहशत सुरू आहे. विरोधकांचं आवाज बंद करण्याचे काम सुरूआहे. महागाई प्रचंड वाढली आहे. तसेच जीवनावश्यक वस्तूंवर कर लावण्यात आला आहे. देशात लोकशाही राहील की नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे जनतेला परिस्थितीची जाणीव करून देणं ही काँग्रेची जबाबदारी आहे. यासाठी काँग्रेसतर्फे ‘स्वातंत्र्याचा गौरव’ ही पदयात्रा काढण्यात येणार आहे.”, असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. ही यात्रा प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात निघाणार असल्याचंही ते म्हणाले.

हेही वाचा – Maharashtra Live Updates : “मधुचंद्र, लग्न हे शब्द ठाकरेंच्या तोंडी शोभत नाही”; सामानातील टीकेला संजय शिरसाटांचं प्रत्युत्तर

“१९४२ च्या चळवळीत शिरीष कुमार यांचं हुत्मामं सर्वांच्या स्मरणात राहणारं आहे. इंग्रजांच्या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला होता. यानिमित्त नंदुरबारमध्ये पदयात्रेदरम्यान मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याची माहिती बाळासाहेब थोरात यांनी दिली. जळगाव जिल्ह्यातील फैसपूर येथे १९३६ साली काँग्रेसचे अधिवेश झाले होते. देशातले सर्व काँग्रेसचे नेते त्यावेळी तिथे आले होते. या ठिकाणीही मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच नगर जिल्ह्यातील भुईकोट इथे पंडित नेहरूंना तीन वर्ष कारावास झाला होता. त्यांनी इथेच डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ इथेच लिहीला होता. त्यामुळे या ठिकाणी आम्ही गौरव यात्रेचा समारोप आहे.” अशी माहितीही त्यांनी दिली.