scorecardresearch

“मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगे-पाटलांना उपोषणास बसवलं, तर फडणवीसांनी…”, काँग्रेसचा गंभीर आरोप

“एकमेकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम सरकारनं करू नये”, असेही काँग्रेसच्या नेत्यांनी बजावलं आहे.

devendra fadnavis manoj jarange patil eknath shinde
नाना पटोले यांनी जरांगे-पाटलांच्या उपोषणावरून देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप केले आहेत. ( फेसबुक छायाचित्र )

मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळण्याासाठी जालन्यातील अमरावाली सराटी येथे मनोज जरांगे-पाटील उपोषणास बसले होते. पण, सरकारने अटी मान्य केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जरांगे-पाटील यांनी १७ व्या दिवशी उपोषण सोडलं. जरांगे-पाटील यांच्या उपोषणावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले आहेत.

“इंडिया आघाडीवरील बैठकीचं लक्ष वळवण्यासाठी जरांगे-पाटलांना उपोषणास बसवलं. त्यानंतर गृहमंत्र्यांनी आंदोलकांवर सौम्य लाठीचार्ज करण्याचे आदेश दिले,” असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. ते नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

Gutami sai mrunmayi
गौतमी देशपांडे ‘या’ लोकप्रिय अभिनेत्याला करतेय डेट? सई ताम्हणकरच्या कमेंटवर उत्तर देत मृण्मयी म्हणाली…
gang rape
संतापजनक: मध्यरात्री घरात घुसून विवाहितेवर गँगरेप; काही तासांतच जोडप्याने उचललं टोकाचं पाऊल
ajit pawar
“माझ्याकडील अर्थखातं पुढं टिकेल, नाही टिकेल सांगता येत नाही, पण…”, अजित पवारांचं विधान
couple Kulhad Pizza Couple Private MMS Leak
कुल्हड पिझ्झा कपलचा प्रायव्हेट व्हिडीओ लीक? सेहज अरोराने दिलं स्पष्टीकरण, म्हणाला ‘माझी चूक…’

हेही वाचा : ठाकरे गटातील खासदाराकडून राहुल नार्वेकरांचा ‘सरडा’ असा उल्लेख; म्हणाले, “अनेक पक्षांचे रंग…”

नाना पटोले म्हणाले, “इंडिया आघाडीवरील लक्ष वळवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ३१ ऑगस्टला जरांगे-पाटलांना उपोषणास बसवलं होतं. त्यानंतर १ सप्टेंबरला ३ ते ४ च्या दरम्यान सौम्य लाठीचार्जचे आदेश गृहमंत्र्यांनी दिले. इंडिया आघाडीवरील लक्ष वळवण्याचं पार भाजपा आणि येड्याच्या सरकारनं केलं आहे.”

हेही वाचा : “फडणवीसांनी राणांना आवर घालण्याची गरज आहे”, बच्चू कडूंच्या वक्तव्यावर रवी राणा प्रत्युत्तर देत म्हणाले…

“पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री म्हणाले ‘बोलून मोकळं मोकळं व्हायचं’. हे फक्त दोन समाजात भांडण लावणार सरकार आहे. सौम्य लाठीचार्ज झाल्यावर फडणवीसांनी माफी मागितली. खरेतर फडणवीसांनी माफी नाहीतर राजीनामा द्यायला हवा होता. एकमेकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम सरकारनं करू नये. ओबीसी आग आहे. ओबीसीत आल्यावर जाळल्याशिवाय सोडणार नाही,” असा इशारा नाना पटोले यांनी दिला आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-09-2023 at 21:40 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×