नाना पटोले प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

करोना  महासाथीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने विधिमंडळात सोमवारी मांडलेला अर्थसंकल्प आरोग्यसेवेला बळकटी देणारा, तसेच कृषी व पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या माध्यमातून रोजगार निर्मितीला चालना देणारा आहे.

करोनाच्या अभूतपूर्व संकटामुळे राज्याच्या उत्पन्नात मोठी घट झालेली असतानाही आघाडी सरकारने आरोग्य, कृषी, शिक्षण, सिंचन, महिला, तरुण, विद्यार्थी, दलित, आदिवासी, अल्पसंख्याक, ग्रामीण व शहरी पायाभूत सुविधांसह विकास प्रकल्पांसाठी भरघोस निधीची तरतूद केली आहे. यामुळे मागच्या सरकारच्या काळात ठप्प झालेली विकासाची प्रक्रिया सुरू होणार असून महाराष्ट्राची विकासपथावर वेगाने घोडदौड सुरू होईल.

विद्यार्थिनी, गृहिणी, कष्टकरी महिलांसाठी राज्य सरकारने नव्या योजना जाहीर केल्या आहेत. घराची नोंदणी महिलांच्या नावावर केल्यास मुद्रांक शुल्कात सवलत देण्यात येणार आहे. राज्यातील ग्रामीण भागातील मुलींना शाळेत जाण्यासाठी मोफत एसटी प्रवास उपलब्ध करून देण्यात येणार आहे.