scorecardresearch

Premium

“…तेव्हापासून पंकजा मुंडेंचं खच्चीकरण सुरू झालं”, काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याचं मोठं विधान

काँग्रेसच्या बड्या नेत्यानं पक्षात पंकजा मुंडेंवर होणाऱ्या कथित अन्यायावर प्रतिक्रिया दिली आहे.

vijay wadettiwar on pankaja munde
भाजपा नेत्या पंकजा मुंडे (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

गेल्या काही काळापासून भाजपा नेत्या पंकजा मुंडे पक्षात नाराज असल्याची चर्चा आहे. अलीकडेच पंकजा मुंडे यांच्या परळीतील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर जीएसटी विभागाने कारवाई केली. यानंतर पंकजा मुंडेंनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली. त्यामुळे पंकजा मुंडे यांना पक्षात डावललं जात असल्याची चर्चा आहे. यावर आता काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पंकजा मुंडे यांचं भाजपात कधीपासून खच्चीकरण केलं जात आहे, याबाबत सूचक विधान वडेट्टीवार यांनी केलं. भारतीय जनता पार्टीला राज्यातील ओबीसी आणि बहुजनांचं नेतृत्व संपवायचं असतं. त्यांचा पक्षात वापर करायचा आणि फेकून द्यायचं, अशी भाजपाची वृत्ती आहे. पंकजा मुंडेंचाही अशाच पद्धतीने वापर करून घेतला, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

Sanjay Nirupam X Post
“महाराष्ट्रातलं मंत्रालय हे आत्महत्यांसाठी कुप्रसिद्ध, सरकार मात्र जाळ्या…”, काँग्रेसची बोचरी टीका
Chandrasekhar Bawankule criticized NCP
कॉंग्रेसची घराणेशाही अन् राष्ट्रवादी काँग्रेस सरदारांची फौज, बावनकुळे यांची टीका
Ajit Pawar Sharad Pawar 2
“अजित पवारांच्या चेहऱ्यावर अपराधीपणा आणि…”; काँग्रेस नेत्याचं वक्तव्य, म्हणाले…
Supriya Sule on Ajit Pawar
“आम्ही उत्तराची वाट पाहतोय,” अजित पवारांबद्दल सुप्रिया सुळेंचे वक्तव्य; म्हणाल्या, “त्यांनी पक्षाच्या…”

हेही वाचा- “मी दररोज बँकांच्या पाया पडतेय”, आर्थिक तंगीबाबत पंकजा मुंडेंनी मांडली व्यथा

विजय वडेट्टीवार पुढे म्हणाले की, पंकजा मुंडे यांनी एकदा ‘मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहे’ असं म्हटलं होतं. हे वाक्य मनुवादी विचारांच्या लोकांना अजिबात पटलं नाही. तेव्हापासून त्यांनी पंकजा मुंडेंचं खच्चीकरण करायला सुरुवात केली. आज भाजपात त्यांच्यावर जो अन्याय होत आहे. तो अन्याय संपूर्ण महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी बघतोय. तो अन्याय किती सहन करायचा आणि पंकजाताईंची सहनशक्ती किती आहे, हे त्यातून दिसलं. परंतु, पंकजा मुंडेंचं नेतृत्व संपवण्यासाठी भाजपाने पद्धतशीरपणे रचना केली आहे. त्याचा पहिला भाग कारखान्यावरील कारवाईचा आहे.

हेही वाचा- “ती नोटीस नव्हे, कारवाई आहे”, बावनकुळेंच्या ‘त्या’ विधानावर पंकजा मुंडेंचं उत्तर

पंकजा मुंडेंना तुम्ही ऑफर द्याल का? असं विचारलं असता विजय वडेट्टीवार म्हणाले, “पंकजा मुंडे मोठ्या नेत्या आहेत. त्या ओबीसी आणि बहुजन समाजाच्या नेत्या आहेत. त्यांनीच योग्य निर्णय घ्यायचा असतो. मी ऑफर देण्याला आणि माझ्या म्हणण्याला काही अर्थ नाही. पक्षात राहून ‘राम’ नाही, असं जेव्हा त्यांना वाटेल. तेव्हा त्यांनी निर्णय घ्यायला हवा.”

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Congress leader vijay wadettiwar on pankaja munde upset in bjp rmm

First published on: 27-09-2023 at 16:46 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×