एकनाथ शिंदे धमकी प्रकरणावर यशोमती ठाकूर यांची प्रतिक्रिया, म्हणाल्या "आजकाल मुख्यमंत्र्यांनाही..." | congress leader yashomati thakur comment on eknath shinde death threat | Loksatta

एकनाथ शिंदे धमकी प्रकरणावर यशोमती ठाकूर यांची प्रतिक्रिया, म्हणाल्या “आजकाल मुख्यमंत्र्यांनाही…”

एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याचा कट रचला जात असल्याची खोटी माहिती देणारा एक फोन कॉल आल्यानंतर राज्यातील पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे.

एकनाथ शिंदे धमकी प्रकरणावर यशोमती ठाकूर यांची प्रतिक्रिया, म्हणाल्या “आजकाल मुख्यमंत्र्यांनाही…”
यशोमती ठाकूर आणि एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याचा कट रचला जात असल्याची खोटी माहिती देणारा एक फोन कॉल आल्यानंतर राज्यातील पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. तर दुसरीकडे या धमकीप्रकरणामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात असून सर्वपक्षीय नेते यावर प्रतिक्रिया देत आहेत. माजी मंत्री तथा काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनीही यावर प्रतिक्रिया दिली असून जीवे मारण्याची धमकी मिळाल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत. सहानुभूती मिळवण्यासाठी हा सर्व प्रकार सुरू आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. राज्यात दर्जेदार राजकारण व्हावे, अशी इच्छादेखील त्यांनी व्यक्त केली. ‘एबीपी माझा’ने याबाबत सविस्तर वृत्त दिले आहे.

हेही वाचा >> गोव्यावरुन दारुची एक बाटली जरी आणली तर…; शिंदे सरकारचा मद्यप्रेमींना इशारा

महाराष्ट्राची अवस्था अशी झाली आहे, की आजकाल मुख्यमंत्र्यांनाही धमकीचा फोन येत आहे. ते सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. अफवा पसरवल्या जात आहेत. महाराष्ट्र हा पुरोगामी आहे. महाराष्ट्राने आतापर्यंत दर्जेदार राजकारण केलेले आहे. यापुढेही महाराष्ट्राकडून असेच राजकारण होईल, अशी आमची अपेक्षा आहे, असे यशोमती ठाकुर म्हणाल्या.

हेही वाचा >> “…म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या जीवाला धोका”, मंत्री दीपक केसरकरांचं वक्तव्य

मुख्यमंत्र्यांना धमकी मिळाल्याच्या चर्चेनंतर उद्धव ठाकरे गटातील नेते विनायक राऊत यांनी या प्रकरणाची देशतील सर्वोच्च तपास यंत्रणेच्या माध्यमातून चौकशी करावी, अशी मागणी केली. “एकनाथ शिंदे यांना जर धमकीचे फोन आले असतील, तर मी देशाचे गृहमंत्री अमित शाह यांना विनंती करतो की, त्यांनी या प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी करावी. तसेच उच्चस्तरीय चौकशीनंतर तपासात उघड झालेल्या बाबी संपूर्ण महाराष्ट्रासमोर उघड कराव्यात,” असे विनायक राऊत म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
गोव्यावरुन दारुची एक बाटली जरी आणली तर…; शिंदे सरकारचा मद्यप्रेमींना इशारा

संबंधित बातम्या

“दादोजी कोंडदेव शिवाजी महाराजांचे गुरू नव्हते आणि…”, पुरंदरेंचा उल्लेख करत काँग्रेसचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर
उदयनराजेंच्या नाराजीवर शिवेंद्रसिंहराजेंचे मोठे विधान, म्हणाले “ज्या घराण्याचे वारस आहात त्याच…”
“आपल्याकडील इतिहास मराठ्यांनी किंवा ब्राह्मणांनी…”, राज ठाकरेंचं मोठं विधान
कर्नाटकचा महाराष्ट्राला डिवचण्याचा प्रयत्न; जतच्या दुष्काळी भागात तलावात सोडले पाणी
“पाच कोटी मोजायला गेले होते का?” चंद्रकांत खैरेंच्या आरोपाला गुलाबराव पाटलांचं प्रत्युत्तर

व्हिडिओ

ताज्या बातम्या
विश्लेषण : रॉय दाम्पत्याचे काय चुकले? 
रायगडमध्ये भात लागवडक्षेत्रात घट; तांदूळ उत्पादनात मात्र वाढ, प्रति हेक्टरी अडीच टन धान्य
शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ ; प्रस्ताव मंजुरीसाठी वित्त विभागाकडे
अशोक मल्होत्रा, जतिन परांजपे क्रिकेट सल्लागार समितीवर
महानगर क्षेत्रात लवकरच आपला दवाखाना ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही