Vasant Chavan Died : नांदेड जिल्ह्यातील किनवटचे माजी आमदार सुभाष जाधव, नांदेडचे प्रकाश खेडकर तसेच २०१४ साली मुखेडहून विधानसभेवर निवडून गेलेले गोविंद राठोड यांच्यानंतर वसंत बळवंतराव चव्हाण हे पदावर असताना मृत्यू पावलेले जिल्ह्यातील चौथे लोकप्रतिनिधी ठरले आहेत. त्यांच्या निधनामुळे जिल्ह्यात नजीकच्या काळात लोकसभेची पोटनिवडणूक अपरिहार्य झाली आहे.

नांदेडच्या राजकीय इतिहासात चांगल्या घटनांसोबत वेगवेगळ्या कालखंडात काही वाईट आणि दुर्दैवी प्रसंगांचीही नोंद झाली आहे. १९५१-५२च्या सार्वत्रिक निवडणुकीपासून १९८४-८५ पर्यंत जिल्ह्यामध्ये लोकसभा किंवा विधानसभेची पोटनिवडणूक घेण्याचा प्रसंग अथवा कारण घडले नव्हते. पण १९८६ साली शंकरराव चव्हाण यांना राज्याचे मुख्यमंत्री करण्यात आल्यामुळे त्यांना केंद्रीय मंत्रिपदासह खासदारकीचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर १९८७ साली जिल्ह्यात पहिल्या पोटनिवडणुकीसह अशोक चव्हाण यांच्या राजकीय पदार्पणाची नोंद झाली होती.

Rangava dies in accident in Sangamner news
संगमनेर मध्ये प्रथमच आढळला रानगवा, मात्र अज्ञात वाहनाच्या धडकेत त्याचा दुर्दैवी मृत्यू !
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
nashi four year old boy died after being found under car in premises of Hotel Express in
सांगोल्याजवळ वाहनांची धडक बसून दोन ऊसतोड मजुरांचा मृत्यू
Policeman dies in accident while returning from funeral of women police
अंत्यसंस्कारावरून परतताना पोलिसाचा अपघाती मृत्यू
vasai virar increase population news in marathi
शहरबात : वाढत्या लोकसंख्येचे बळी
2 killed as auto overturn in khed taluka
मरकळ येथे रिक्षा उलटून दोघांचा मृत्यू
36 year old man from Pimplegurav died due to GBS complications and pneumonia
पिंपरी : ‘जीबीएस’मुळे युवकाचा मृत्यू
27 year old youth died of heart attack on field while practicing cricket in Kopar village of Virar East
क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, २७ वर्षीय तरुणाचा मृत्यू ; विरार येथील घटना

हे ही वाचा… Maharashtra News Live : बदलापूर घटनेतील आरोपी अक्षय शिंदेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

पुढच्या म्हणजे १९९०च्या दशकात जिल्ह्यात विधानसभेच्या दोन पोटनिवडणुका झाल्या. १९९२ साली किनवटचे तत्कालीन आमदार सुभाष जाधव यांचे अपघाती निधन झाल्यामुळे त्याच वर्षात तेथे पोटनिवडणूक झाली. या निवडणुकीत भीमराव केराम यांच्या अनपेक्षित विजयाची नोंद झाली. याच दशकाच्या अखेरीस बिलोलीचे तत्कालीन आमदार भास्करराव पाटील खतगावकर हे १९९८ साली लोकसभेवर निवडून गेल्यामुळे त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर तेथे झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेस पक्षातर्फे बळवंतराव चव्हाण निवडून आले होते.

पुढील काही वर्षांनी सन २००३ सालच्या गणेशोत्सवाच्या समारोपदिनी नांदेडचे तत्कालीन आमदार प्रकाश खेडकर यांचे श्री विसर्जनाच्या मिरवणुकीदरम्यान अचानक निधन झाले. त्यानंतर वर्षभराचा कालावधी असतानाही या मतदारसंघात पोटनिवडणूक झाली नाही. पण नंतरच्या विधानसभा निवडणुकीत खेडकरांच्या पत्नी अनसूयाताई शिवसेनेतर्फे उभ्या राहिल्या आणि निवडून आल्या.

सन २०१४ साली मुखेड विधानसभा मतदारसंघात माजी नगराध्यक्ष गोविंद राठोड हे भाजपातर्फे निवडून आले होते, पण आमदारकीची शपथ घेण्यापूर्वी नांदेड-मुंबई रेल्वे प्रवासातच काळाने त्यांच्यावर झडप घातल्यामुळे या मतदारसंघात २०१५ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत राठोड यांचे पुत्र डॉ.तुषार पहिल्या प्रयत्नातच आमदार झाले.

आमदारांच्या निधनामुळे किंवा राजीनाम्यामुळे तीन मतदारसंघांनी पोटनिवडणुकांचा अनुभव घेतल्यावर अलीकडेच लोकसभेवर निवडून गेलेल्या काँग्रेसच्या वसंतराव चव्हाण यांचे दोन आठवड्यांच्या आजारपणानंतर २६ ऑगस्ट रोजी निधन झाल्यामुळे येत्या काळात जिल्ह्यात आणखी एका पोटनिवडणुकीची नोंद होईल.

हे ही वाचा… Deepak Kesarkar : “अशा प्रकरणांनंतर संपूर्ण सिस्टम बदलावी लागेल”, बदलापूर प्रकरणी दीपक केसरकरांचं महत्त्वाचं सुतोवाच; शाळांमध्ये पॅनिक बटण लावणार?

नांदेड लोकसभा मतदारसंघाला शंकरराव चव्हाण, केशवराव धोंडगे, व्यंकटराव तरोडेकर, अशोक चव्हाण, सूर्यकांता पाटील, भास्करराव खतगावकर इत्यादी दिग्गजांची परंपरा आहे. या नामावलीत सरपंचपदापासून राजकीय प्रवास सुरू करणार्‍या ७१ वर्षीय वसंतरावांचे नाव अलीकडेच विराजमान झाले. त्यांनी दोन महिन्यांपूर्वी (२५ जून) लोकसभेत खासदारपदाची शपथ घेतली. त्यानंतर ते संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सहभागी झाले. या काळात जिल्ह्यातील काही महत्त्वाचे प्रश्न संबंधितांसमोर मांडले. रखडलेल्या नांदेड-बिदर रेल्वे मार्गाच्या विषयातही त्यांनी लक्ष घातले होते.

वसंतरावांनी १५ ऑगस्ट रोजी ७१व्या वर्षात पदार्पण केले होते. पण त्याच्या दोन दिवस आधी श्वास घेण्यास झालेल्या त्रासामुळे त्यांना आधी नांदेडच्या आणि मग हैदराबादच्या इस्पितळात दाखल करण्यात आले. तब्बल दोन आठवडे त्यांचा मृत्यूशी संघर्ष सुरू होता. पण हा संघर्ष २६ ऑगस्टच्या पहाटे थांबला. तब्बल साडेचार दशकांचा राजकीय प्रवास मागे ठेवून या नेत्याने सार्‍यांचाच निरोप घेतला.

Story img Loader