मोठ्या रकमेसह पकडलेल्या कॉंग्रसच्या तीन आमदारांवर काँग्रेसकडून कारवाई करण्यात आली आहे. या तीन आमदारांना पक्षातून निलंबित करण्यात आले असल्याची माहिती झारखंड काँग्रेसचे सरचिटणीस आणि प्रभारी अविनाश पांडे यांनी दिली. इरफान अन्सारी, राजेश कछाप आणि नमन बिक्सल, अशी अटक करण्यात आलेल्या आमदारांची नावे आहेत.

हेही वाचा – “ईडीच्या कारवाईला घाबरून कुणी आमच्याकडे येत असेल तर…”, राऊत-खोतकरांचं नाव घेत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान

aap party leader aatishi
‘आप’च्या नेत्या आतिशी यांना नोटीस; भाजपवर केलेल्या आरोपांबाबत उत्तर देण्याचे निर्देश
Bhiwandi lok sabha
भिवंडीत महाविकास आघाडीत बंडाचे वारे ? काँग्रेस लढण्यावर ठाम
triangular fight between bjp vanchit and congress in akola
अकोल्यात तिरंगी लढतीचा जुनाच डाव नव्याने; नवे समीकरण कुणाच्या पथ्यावर?
Yavatmal Shivsena Thackeray
यवतमाळ : शिवसेना ठाकरे गटात निवडणुकीच्या तोंडावर संघटनात्मक बदल; अनुभवी व जुन्या शिवसैनिकांना दूर सारत नवीन कार्यकर्त्यांना संधी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या आमदारांच्या गाडीत पैसे असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी वाहन तपासणीसाठी थांबवले होते. यावेळी या आमदारांच्या गाडीतून सुमारे ४८ लाख रुपये जप्त करण्यात आले होते.

दरम्यान, काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी ट्वीट करत भाजपावर टीका केली आहे. झारखंडमधील भाजपचे ‘ऑपरेशन लोटस’ आज रात्री हावडा येथे उघड झाले. दिल्लीतील ‘हम दो’चा गेम प्लॅन झारखंडमध्ये करण्याचा आहे. जे त्यांनी महाराष्ट्रात एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस जोडीने केला आहे.”, असं ते म्हणाले.