काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ‘मी मोदी यांना मारू शकतो’, ‘शिवी देऊ शकतो’, असं वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात मोठे वादळ उठलं होतं. यानंतर नाना पटोले यांनी आपण एका गावगुंड मोदीबाबत बोलत होतो असा दावा केला होता. पोलिसांनी या गावगुंडाला अटक केली आहे. मात्र याबाबत बोलताना नाना पटोले यांनी पुन्हा एकदा नवा वाद ओढवून घेतला आहे. ज्याची बायको पळून जाते, त्याचं नाव मोदी ठरतं असं नाना पटोले म्हणाले आहेत. यावरुन भाजपाकडून राज्यभरात आंदोलनं केली जात आहे.

नाना पटोले यांनी एबीपी माझाशी बोलताना यावर प्रतिक्रिया दिली असून एका गावगुंडाचं भाजपा इतकं समर्थन का करत आहे? अशी विचारणा केली असून पुतळे जाळायचे असतील तर बेटी बचाव बेटी पटाव म्हणणाऱ्यांचे जाळा असं म्हणत मोदींवर निशाणा साधला.

jitendra awhad ajit pawar l
“नशीब त्यांनी डॉक्टरांना विषाचं इंजेक्शन…”, अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून जितेंद्र आव्हाडांचा टोला
Career MPSC exam Guidance UPSC job
करिअर मंत्र
supriya sule, ajit pawar, sunetra pawar
“दुसऱ्यांच्या घरात मी कशाला डोकावू?”, असं का म्हणाल्या सुप्रिया सुळे
Tarun Tejankit initiative by Loksatta to celebrate the creative achievements of the young generation
‘तरुण तेजांकितां’वर पुनर्झोत!

मोदी यांना मारू शकतो म्हणणाऱ्या नाना पटोलेंवर गडकरी संतापले, पोलिसांना म्हणाले “त्यांना अटक करा…”

“मी पंतप्रधान नरेंद्र मोदी नाही तर एका गावगुंडाबाबत असं बोललो होतो हे आधीच स्पष्ट केलं होतं. आम्हाला पंतप्रधानपदाचा सन्मान माहिती आहे, भाजपाला ते माहिती नाही. मनमोहन सिंग यांच्याविरोधात ते काय बोलत होते हे सर्वांना माहिती आहे. एका गावगुंडाचं भाजपा इतकं समर्थन का करत आहे? हा प्रश्न जनतेसमोर आहे. हा विषय संपला असून जनतेचे प्रश्न सोडवणं गरजेचं आहे,” असं नाना पटोले म्हणाले आहेत.

“बायको सोडून गेल्यानं मला सगळे मोदी म्हणतात”; पटोलेंनी उल्लेख केलेल्या ‘त्या’ गावगुंडाचा दावा

“गावगुंडाने माध्यमांसमोर येऊन मला मोदी का म्हणतात यासंबंधी सांगितलं, तेच वाक्य मी म्हटलं. बदनामी करण्याचं काम थांबवा असं मी सांगितलं असून गावगुंडाचं समर्थन करण्याचं कारण काय? पुतळे जाळायचे असतील तर भारतमाता की जय म्हणून देश विकणाऱ्यांचे जाळा. बेटी बचाव बेटी पटाव म्हणणाऱ्यांचे जाळा, शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालून जीवे मारणाऱ्या केंद्रातील मंत्र्याच्या विरोधात जाळा. देशात बेरोजगाऱी असून शेतकरी, व्यापारी आत्महत्या सुरु आहेत. ज्यांनी या व्यवस्थेला निर्माण केलं त्यांचे पुतळे जाळले पाहिजेत. पण मूळ मुद्याला भाजपा फिरवण्याचं काम करत असून देशातील आणि महाराष्ट्रातील जनता ओळखत आहे,” असंही नाना पटोले म्हणाले.

‘मोदी हे माझे टोपण नाव’ ; ‘गावगुंड’ अखेर माध्यमांसमोर!

“काँग्रेस नेहमी गावगुंडाविरोधात राहणार. ते त्याचा अर्थ काय लावत असतील तो त्यांचा प्रश्न आहे. गावगुंड बोलला असून आतो तो विषय आता थांबवला पाहिजे. माझे पुतळे जाळण्याची, उद्धार करण्याची प्रक्रिया किती दिवस सुरु ठेवायची ते ठेवावं. पोलीस यासंबंधी कारवाई करतील. पण राज्यात करोनाची स्थिती असतानाही आंदोलन कशाला? गावगुंडासाठी इतकं प्रेम कशाला?,” अशी विचारणा नाना पटोले यांनी केली आहे.

जो न्याय नारायण राणेंसाठी होता तोच नाना पटोलेंसाठी हवा या भाजपाच्या मागणीवर ते म्हणाले की, “नारायण राणेंचं आणि माझं वाक्य काय होतं? मी प्रधानमंत्र्यांविरोधात बोललो नसून गावगुंडाबाबत बोललो. तो गावगुंड समोर आला असताना मग बालहट्ट कशासाठी? मूळ प्रश्नापासून लोकांना दूर नेलं जात आहे. सुसंस्कृत पक्षाचे लोक आहात तर मग महिला, मुलींचा अपमान करणाऱ्यांना काही बोलणार नाही का? आत कुठे गेली अक्कल? माझ्या वाटेला आल्याने त्यांचा फायदा होत असेल तर यावं. काँग्रेस गावगुडांच्याविरोधात असून कायम राहणार”.

“भाजपाची जी बदनामी होत आहे ती झाकण्याचा प्रयत्न सुरु आहे. बेटी बचाव बेटी पटाव हे वाक्य त्यांना मान्य आहे का?,” अशी विचारणा नाना पटोले यांनी केली आहे.