Nana Patole on Sanjay Raut: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे जागावाटपाच्या चर्चेसाठी उपस्थित असतील तर आम्ही बैठकीला येणार नाही, अशी भूमिका शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाच्या वतीने घेण्यात आल्याची चर्चा आज दिवसभर रंगली होती. या चर्चेवर नाना पटोले यांनी नाराजी व्यक्त केली. उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडून कुणीही अशी भूमिका मांडलेली नसताना माध्यमांमध्ये चुकीच्या बातम्या प्रसारित होत आहेत, असे ते म्हणाले. आमच्यात उत्तम समन्वय आहे. पण भाजपात मारामाऱ्या सुरू आहेत. त्याच्या बातम्या का केल्या जात नाहीत? असा प्रतिप्रश्न त्यांनी विचारला.

संजय राऊत उद्धव ठाकरेंपेक्षा मोठे नेते

संजय राऊत यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर बोलताना नाना पटोले म्हणाले, “संजय राऊत हे कदाचित उद्धव ठाकरे साहेबांपेक्षा मोठे नेते असतील. त्यांना उद्धव ठाकरेंशी बोलावे लागत नसेल. पण आमच्या पक्षात एक प्रोटोकॉल आहे. आमचे पक्षश्रेष्ठी दिल्लीत आहेत. आम्हाला सर्व निर्णयांची माहिती त्यांना द्यावी लागते. तिकडे जयंत पाटील यांना सर्व माहिती शरद पवारांना द्यावी लागते. कदाचित शिवसेनेत ही पद्धत नसेल, तर तो त्यांचा प्रश्न आहे.”

हे वाचा >> Maharashtra Vidhansabha Election 2024 : जागा वाटप होईना, मुख्यमंत्रीपद ठरेना; महायुतीत चढाओढ, शिवसेनेच्या बैठकीत काय ठरलं?

तुटेपर्यंत ताणू नका – उद्धव ठाकरे

संजय राऊत आणि नाना पटोले यांच्यात जागावाटपावरून खटके उडत आहेत. यावर शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांनाही प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले की, मी याबाबत माहिती घेऊन नंतर बोलेन. विदर्भातील जागेवरून मतभेद आहे. यावरून काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींशी काही काही बोलणे झाले आहे का? याबद्दल प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, एकापेक्षा जास्त पक्ष जेव्हा एकत्र निवडणूक लढवित असतात, तेव्हा जागावाटपावरून थोडीशी खेचाखेची होते. पण ती तुटेपर्यंत ताणायची नाही, हे सर्व पक्षांनी लक्षात ठेवायला हवे. पण मोठा तंटाबखेडा झाला, असे वाटत नाही.

Party President Mallikarjun Kharge met by Nana Patole Print politics news
राज्यातील काँग्रेस नेत्यांना सबुरीचा सल्ला; नाना पटोलेंकडून पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट ( संग्रहित छायाचित्र )/ लोकसत्ता

जागावाटपावरून महाविकास आघाडीत रस्सीखेच आहे का? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनाही विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, जागावाटपावरून कोणताही वाद नाही. शेवटी राजकीय जीवनातील भीष्माचार्य हे महत्त्वाची भूमिका बजावतील. पक्षांमध्ये कोणतेही वाद नाहीत. दोन नेत्यांमध्ये खटके उडाले आहेत. पण त्याने महाविकास आघाडीला कोणतेही नुकसान होणार नाही.

Story img Loader