पंतप्रधान नरेंद्र मोदींची १२ वर्षे कारकीर्द देशाची प्रतिष्ठा वाढवणारी ठरली आहे. काँग्रेसचा भरीचा काळ होता तेव्हा काँग्रेसलाही जे यश मिळालं नव्हतं ते यश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीत एनडीएला मिळालं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पंडित नेहरुंचा ४ हजार ३९८ दिवसांचा पंतप्रधान पदावर राहण्याचा रेकॉर्ड मोडला याचा आम्हाला आनंद आहे. मागील १२ वर्षांत पंतप्रधान मोदींना ३२ आंतरराष्ट्रीय सन्मान मिळाले. त्यातले २४ सन्मान हे विविध देशांमधले सर्वोच्च सन्मान आहेत हा देखील एक रेकॉर्ड आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीस आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कारकिर्दीला १२ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पत्रकार परिषद घेतली त्यात त्यांनी आपलं मनोगत मांडलं.
जगातल्या सर्वात लोकप्रिय नेत्यांपैकी एक नेते म्हणजे नरेंद्र मोदी-फडणवीस
जगातल्या सर्वात लोकप्रिय नेत्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गणना केली जाते. विविध रेटिंग्ज देणाऱ्या जगातल्या एजन्सीजनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सर्वोच्च रेटिंग दिलं आहे. गरीबी आणि तीव्र गरीबीतून २५ कोटी लोकांना बाहेर काढण्याचं काम मोदींच्या नेतृत्वात झालं. संयुक्त राष्ट्रांनीही हा दशकातला चमत्कार आहे असं विधान केलं. ८१ कोटी नागरिकांना अन्न सुरक्षा देण्याचं काम पंतप्रधान मोदींनी केलं. ११ कोटी हून अधिक शेतकऱ्यांना ४.३ लाख कोटी रुपये देण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं. किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून जवळपास ८ लाख कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळाले. तसंच शेतकऱ्यांच्या कर्जाची मर्यादा ३ लाखांवरुन ५ लाखांवर नेण्यात आली. दूध उत्पादन करण्यात आपला देश भारत आघाडीवर आला असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
भारत जगातली चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था झाला आहे-फडणवीस
भारत जगातली चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था झाला आहे. चालू वर्षातील आर्थिक वर्षाचा दर हा ७ टक्क्याहून अधिक आहे. जगात सर्वाधिक वृद्दीचा दर भारताचा आहे फास्टेट ग्रोईंग इकॉनॉमी हा बारताचा प्लस पॉईँट आहे असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. आपण तयार केलेलं यूपीआय ३० देश वापरत आहेत. मोबाइलची निर्यात १६३ पटींनी आपण वाढवली आहे. अत्यंत वेगाने भारताची वाटचाल चालली आहे. विदेशी मुद्रा भांडार ६७ लाख कोटी रुपये आता आपल्याकडे आहेत. पुढील ११ महिन्यांचे सगळे इंपोर्ट आणि भारतावर जे कर्ज आहे ते ९४ टक्के कव्हर करण्याची क्षमता भारताकडे आहे. एक काळ असाही होता की भारत विदेशी कर्जाखाली बुडाला होता. वर्ल्ड बँक, आयएमएफए सांगायचं यातून बाहेर निघाला नाहीत तर डेथ ट्रॅपमध्ये देश जाईल. आज त्याच भारताकडे आज परत करावं लागलं तरीही ९४ टक्के कर्ज आपण एका दिवसात परत करु शकतो अशी स्थिती आहे. युपीएच्या काळात एक महिन्याची विदेशी मुद्राही नसायची. आता ती स्थिती ११ महिन्यांची विदेशी मुद्रा उपलब्ध आहे यावर पोहचली आहे. जीएसटी २२ लाख कोटींवर गेला आहे. यामध्ये पहिल्या क्रमांकावर महाराष्ट्र आहे. युपीएचा जो व्यवहार आहे यामध्ये १२ हजार पटीने वाढ झाली आहे. ३१४ लाख कोटी रुपयांचे डिजिटल व्यवहार भारतात चालले आहेत. चीनसह सगळ्या देशांना डिजिटल व्यवहारांमध्ये भारताने मागे टाकलं आहे, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय.
महिला सशक्तीकरणवर भर दिला आहे-फडणवीस
लखपतीदीदी कार्यक्रमातर्गत ३ कोटी महिला लखपती दीदी झाल्या आहेत. आपण ५० लाख टप्पा गाठला आहे. भारताच्या सैन्यात ११ हजार महिलांची संख्या आहे, जी आधी केवळ ३ हजार होती. महिला सशक्तीकरण करणे आणि महिला केंद्रीत अर्थव्यवस्था करण्याचे प्रयत्न आपण करतो आहे. सुशासन आणि सुप्रशासन हे दोन्ही बलस्थान राहिलेत. सरकारची योजनांचे बळकटीकरण आपण केले. डिजिटल योजनांच्या माध्यमातून ५८ लाख कोटी रुपये विविध योजनांतून दिले आहेत. जेम पोर्टलच्या माध्यमातून आपण भ्रष्टाचार संपवला. पायाभूत सुविधांचे क्षेत्र आहे ते वाढवले. युपीएच्या काळात २ लाख कोटी खर्च केले जायचे, आता खर्च १२ लाख कोटी रुपयांवर गेला आहे अशी माहिती देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.
