काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदी नावाचा उल्लेख करत केलेल्या वक्तव्यामुळे आधीच भाजपा आक्रमक झाली असताना आता ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. अटकेच्या भीतीपोटी सरसंघचालक हेडगेवारांनी सुभाषचंद्र बोस यांची भेट नाकारली होती असा दावा नितीन राऊत यांनी केला आहे. ज्यांनी जातींमध्ये तंटे निर्माण केले तेच आपल्याला आज शहाणपण शिकवत आहेत असंदेखील नितीन राऊत म्हणाले आहेत. ते यवतमाळमधील वणी येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ज्याची बायको पळून जाते त्याचं नाव मोदी वक्तव्यावर नाना पटोलेंचं स्पष्टीकरण; म्हणाले, “बेटी बचाव बेटी पटाव म्हणणाऱ्यांचे…”

ते म्हणाले की, “हेडगेवार नावाचे सरसंघचालक नाशिकमध्ये मुक्कामी होती. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आपल्या खासगी सचिवाला निरोप देऊन नाशिकला त्यांच्या भेटीला पाठवलं. त्या खासगी सचिवाने हेडगेवारांच्या माणसाला भेटायचं असल्याचं सांगितलं. खासगी सचिव दारात उभे असताना, ती व्यक्ती आतमध्ये जाऊन हेडगेवारांना सांगते की तुम्हाला नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याकडून निरोप आला आहे. त्यांचे खासगी सचिव आले आहेत”.

नितीन राऊतांची शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या खात्यासंबंधी थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार; म्हणाले “काँग्रेस पक्ष म्हणून…”

पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “यावेळी हेडगेवार आपण आजारी आहोत, भेटायचं नाही असं सांगण्यास सांगतात. मी जर आज त्यांना भेटलो तर ब्रिटीश आमच्यासोबत काय करतील…कदाचित जेलमध्ये टाकतील. हे सगळं तो गृहस्थ बाहेरुन ऐकत होता. तर हे असे गुलाम लोक आज आपल्याला शिकवू लागले आहेत. दुर्दैवाने विचारसुद्दा इतके विषारी झाले आहेत यांनी धर्मा-धर्मात, जाती-जातीत तंटे निर्माण केले आहेत”.

सरसंघचालक हेडगेवार यांनी १९३० मध्ये यवतमाळ जिल्ह्यात जंगल सत्याग्रह केला. आता करळगाव येथील जंगलात संग्रहालय उभारण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर ऊर्जामंत्री राऊत यांनी वक्तव्य केल्याने नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

“नितीन राऊत यांनी अभ्यास करावा”

सरसंघचालक हेडगेवार यांच्यासंबंधी बोलण्यापूर्वी ऊर्जामंत्री राऊत यांनी अभ्यास करावा, असा सल्ला भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांनी दिला आहे. ऊर्जामंत्रीदेखील नागपूर येथील रहिवासी आहे. मुळात काँग्रेस पक्षाने देशाला खरा इतिहास माहिती होऊ दिला नाही, अशी टीका करत भुतडा यांनी ऊर्जा मंत्री राऊत यांनी केलेल्या वक्तव्याची निंदा केली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress nitin raut on rss founder hedgewar netaji subhash chandra bose sgy
First published on: 25-01-2022 at 15:05 IST