Sonia Gandhi ED Interrogation: काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची सक्तवसुली संचालनायकडून (ईडी) चौकशी सुरू असून, याविरोधात पक्षाकडून देशभरात आंदोलन केलं जात आहे. दरम्यान राजधानी दिल्लीमधील आंदोलनात सहभागी झालेले राहुल गांधी यांच्यावर पोलिसांनी कारवाई करत त्यांना ताब्यात घेतलं आहे. यानंतर आता काँग्रेस नेते नाना पटोले यांनादेखील पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ईडीच्या कारवाईविरोधात ते मुंबईत आंदोलन करत होते. यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे.

नाना पटोले यांना पोलीस ताब्यात घेत असताना काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे. “जब जब मोदी डरता है, पोलीस को आगे करता है” अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या आहेत.

PM Narendra Modi On Congress
‘राहुल गांधींनी अमेठी सोडलं, आता वायनाडही सोडावं लागणार’, पंतप्रधान मोदींचा नांदेडमधून काँग्रेसवर निशाणा
PM Narendra Modi On Congress
पंतप्रधान मोदींचा काँग्रेसला खोचक टोला; म्हणाले, “बारशाला गेला आणि बाराव्याला…”
Sevak Waghaye
“नाना पटोलेंनी पैसे घेऊन डॉ. प्रशांत पडोळेंना उमेदवारी दिली,” काँग्रेसच्या माजी आमदाराचा आरोप; म्हणाले, “भाजप उमेदवाराला…”
Sangli Lok Sabha candidacy Congress workers focus on Delhi decision
सांगली लोकसभा उमेदवारी काँग्रेस कार्यकर्त्यांचे लक्ष दिल्लीच्या निर्णयाकडे

नाना पटोले यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, “महात्मा गांधी यांच्या विचाराने सत्याग्रही पद्धतीनं आणि अंहिसेच्या मार्गाने हे आंदोलन सुरू असताना केंद्रातील हुकूमशाही सरकारने ज्या पद्धतीने दबावतंत्राचा अवलंब केला आहे. त्या दबावतंत्राच्या विरोधात आमचं हे आंदोलन आहे. आता जशाला तसं उत्तर देण्याची भूमिका काँग्रेस पक्षानं घेतली आहे. देशाला बुडवणारी व्यवस्था जी केंद्रात बसली आहे. त्याच्याविरोधात आमचं आंदोलन आणखी तीव्र करण्यात येणार आहे.”

याआधी २१ जुलै रोजी ईडीने सोनिया गांधी यांना चौकशीसाठी ईडी कार्यालयात बोलावलं होतं. त्यांची दोन तास चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा ईडीने सोनिया गांधी यांना चौकशीसाठी बोलावलं आहे. त्यामुळे देशभरात अनेक ठिकाणी काँग्रेस नेते, कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. ईडीच्या कारवाईविरोधात ते रस्त्यावर उतरले असून आंदोलन करत आहेत. ‘नॅशनल हेराल्ड’ प्रकरणात गेल्या महिन्यात राहुल गांधी यांनाही चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. त्यांचीही चौकशी करण्यात आली होती.