Congress Protest amid Sonia Gandhi’s ED inquiry Updates : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुरुवारी (२१ जुलै) काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची नॅशनल हेराल्ड प्रकरणी अडीच तास चौकशी झाली. यात ईडीने अनेक प्रश्न विचारले. त्यांना सोमवारी (२५ जुलै) पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. सोनिया गांधींची ईडी चौकशी म्हणजे राजकीय सुडाची कारवाई आहे, असा आरोप काँग्रेसने केला. तसेच याविरोधात देशभरात ठिकठिकाणी आंदोलनं करण्यात आली. काही ठिकाणी पोलीस आणि काँग्रेस कार्यकर्ते आमनेसामनेही आले. पोलिसांनी अनेक काँग्रेस नेत्यांनाही ताब्यात घेतलं. एकूणच सोनिया गांधींची ईडी चौकशीबाबत घडलेल्या प्रत्येक घडामोडीचा आढावा एका क्लिकवर…

BJP vs Congress Members Fighting On Tv Physical Brawl
भाजप व काँग्रेसच्या सदस्यांमध्ये हाणामारी, लाईव्ह टीव्हीवर लाथा- बुक्के? Video शेअर करताना झाली ‘ही’ चूक
Vijay Wadettiwar said to demand lok sabha candidacy from congress party is my right
लोकसभेची उमेदवारी मागणे हा माझा अधिकार – वडेट्टीवार
amravati, sushma andhare, criticise, bjp, navneet rana, caste certificate case, result, supreme court, mahayuti, maha vikas aghadi, lok sabha 2024, maharashtra politics, marathi news,
‘‘नवनीत राणांच्‍या जात प्रमाणपत्राचा निकाल भाजपला ठाऊक आहे का?’’ सुषमा अंधारेचं टीकास्र
Arvind Kejriwal Arrested People In Huge Crowd Reached Road
अरविंद केजरीवालांच्या अटकेनंतर रस्त्यावर उद्रेक? समोर आली नवी माहिती, लोक निषेधाला उतरले पण…
Live Updates

Congress Protest against Sonia Gandhi ED inquiry Updates : सोनिया गांधींच्या ईडी चौकशीविरोधात काँग्रेस पक्ष आक्रमक झाला. देशभरात ठिकठिकाणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनं केली.

18:10 (IST) 21 Jul 2022
ईडीकडून अडीच तास सोनिया गांधींची चौकशी, पुन्हा सोमवारी बोलावणं

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, "ईडीने सोनिया गांधींची अडीच तास चौकशी केली. त्यांना पुन्हा सोमवारी (२५ जुलै) चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. विशेष म्हणजे चौकशी दरम्यान ईडीने दोन डॉक्टर आणि रुग्णवाहिकाही तयार ठेवली होती. याशिवाय प्रियंका गांधी यांनाही ईडी कार्यालयात प्रवेश दिला होता. चौकशी दरम्यान दोनदा भेटण्यास परवानगी देण्यात आली. अडीच तासांच्या चौकशीनंतर ईडीने सोनिया गांधींना औषधोपचारासाठी घरी जाण्याची परवानगी दिली."

https://twitter.com/ANI/status/1550089825012699137

17:53 (IST) 21 Jul 2022
राजस्थानमध्ये काँग्रेसचं मोदी सरकारविरोधात आंदोलन

राजस्थानमध्ये काँग्रेसचं मोदी सरकारविरोधात आंदोलन, हुकुमशाहीचा आरोप करत जोरदार घोषणाबाजी

https://twitter.com/INCIndia/status/1550080648072687617

17:31 (IST) 21 Jul 2022
अमरावती : जीव गेला तरी बेहत्तर, दडपशाही सहन करणार नाही – यशोमती ठाकूर

“ केंद्रातील मोदी सरकारची दडपशाही सहन करणार नाही, प्रसंगी आमचा जीव गेला तरी बेहत्तर! सोनिया गांधी यांना कुणी हात लावला, तर आम्ही त्यांना माफ करणार नाही”, असा इशारा माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिला.

सविस्तर वाचा

17:09 (IST) 21 Jul 2022
विरोधकांची मुस्कटदाबी करण्यासाठी ईडीसह सरकारी यंत्रणांचा वापर, विरोधी पक्षांकडून संयुक्त पत्रक प्रकाशित भूमिका स्पष्ट

मोदी सरकारकडून विरोधकांची मुस्कटदाबी करण्यासाठी ईडीसह सरकारी यंत्रणांचा वापर, विरोधी पक्षांकडून संयुक्त पत्रक प्रकाशित भूमिका स्पष्ट, सुडाची कारवाई करून विरोधकांचा आवाज दाबता येणार नाही, असाही इशारा

https://twitter.com/kharge/status/1550077900962942976

17:00 (IST) 21 Jul 2022
सोनिया गांधींची प्रतिमा खराब करण्यासाठी ही कारवाई - मल्लीकार्जून खरगे

राज्यसभा विरोधी पक्ष नेते मल्लीकार्जून खरगे म्हणाले, "भाजपाचे लोक गांधीजीच्या मार्गावर चालणारे नाहीत. ते गोडसेच्या मार्गावर चालणारे लोक आहेत. स्वातंत्र्य नाही दुराग्रह आहे म्हणणारे लोक कधी लढत नाहीत. सत्याग्रहाने देशाला स्वातंत्र्य मिळाले. आमच्या पक्षाच्या नेत्याची प्रतिमा खराब करण्यासाठी ही कारवाई केली जात आहे. मात्र, आम्ही घाबरणार नाही."

https://twitter.com/INCIndia/status/1550063032163700736

16:43 (IST) 21 Jul 2022
असंवैधानिक पद्धतीने घटनेची पायमल्ली केली जात आहे - रजनी पाटील

काँग्रेस खासदार रजनी पाटील म्हणाल्या, "असंवैधानिक पद्धतीने घटनेची पायमल्ली केली जात आहे. ईडी, सीबीआय, न्यायव्यवस्था या सर्वांना ताब्यात ठेवायचं आणि त्यांच्या माध्यमातून सर्वांना धाक आणि दडपशाही करून गुलाम बनावयाचा प्रयत्न सुरू आहे. माणसांना गुलाम बनवायच्या या मानसिकतेविरोधात आम्ही लढत आहोत. सोनिया गांधींनी या देशातील सर्वोच्च पद असलेलं पंतप्रधान पद त्यागलं आहे. आम्ही या संदर्भात संसदेतही आंदोलन केलं."

https://twitter.com/rajanipatil_in/status/1550053447088902144

16:32 (IST) 21 Jul 2022
जीव गेला तरी बेहत्तर, दडपशाही सहन करणार नाही - यशोमती ठाकूर

https://twitter.com/AdvYashomatiINC/status/1550073545409318913

अमरावतीत काँग्रेसने सोनिया गांधींवरील ईडी कारवाईविरोधात आंदोलन केलं. यावेळी काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर म्हणाल्या, “केंद्रातील मोदी सरकारची दडपशाही सहन करणार नाही. प्रसंगी आमचा जीव गेला तरी बेहत्तर! सोनिया गांधींना कुणी हात लावला, तर आम्ही त्यांना माफ करणार नाही." या आंदोलात यशोमती ठाकूर यांनी मोदी सरकारच्या दडपशाही विरोधात जोरदार घोषणा दिल्या. यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात अमरावती जिल्हा काँग्रेसच्यावतीने अमरावती विभागीय कार्यालयावर निषेध मोर्चा काढून इर्विन चौकात आंदोलन करण्यात आले. यावेळी यशोमती ठाकूर यांनी माध्यमाशी संवाद साधत होत्या.

यशोमती ठाकूर म्हणाल्या, "केंद्रातील मोदी सरकारने जे काही चालवलं आहे, कित्येक राज्यांमध्ये ईडीच्या भरोशावर ऑपरेशन लोटस सुरू केलेलं आहे. आज आमच्या नेत्या सोनिया गांधी यांची प्रकृती ठीक नसताना, त्या रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांना या निर्दयी माणसाने चौकशीला बोलावलं आहे. काँग्रेस नेत्या सोनिया गांधींची ईडीमार्फत केली जाणारी चौकशी ही राजकीय द्वेषातून केली जात आहे."

"केंद्रीय तपास यंत्रणा मोदी सरकारच्या कळसूत्री बाहुल्या झाल्या आहेत. या यंत्रणा केवळ सरकारच्या इशाऱ्यावर सरकार विरोधात आवाज उठवणाऱ्या, तसेच विरोधी पक्षांच्या नेत्यांवरच कारवाई करत आहेत. ही दडपशाही आम्ही सहन करणार नाही," असा इशारा यशोमती ठाकूर यांनी दिला.

‘खूप झाली दडपशाही, देशात हवी लोकशाही’, ‘बंद करा बंद करा, तपास यंत्रणांचा गैरवापर बंद करा’ अशा आशयाचे फलक घेऊन अमरावतीत आंदोलन करण्यात आलं. अमरावती जिल्हा काँग्रेस ग्रामीण व शहरच्यावतीने आज अमरावती येथील इर्विन चौकात हे निषेध आंदोलन करण्यात आले. दरम्यान अमरावती विभागीय कार्यालयावर निषेध मोर्चा काढून जिल्हाधिकारी पवनीत कौर यांना निवेदन देण्यात आले.

16:24 (IST) 21 Jul 2022
उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस कार्यकर्ते व पोलीस आमनेसामने

उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस कार्यकर्ते व पोलीस आमनेसामने, काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधींच्या ईडी चौकशीविरोधात आंदोलनादरम्यान घटना

https://twitter.com/ANINewsUP/status/1550038523423891456

16:16 (IST) 21 Jul 2022
नागपूर : ईडी कार्यालयासमोर काँग्रेसची निदर्शने

केंद्रातील भाजप सरकार महागाई, बेरोजगारी, महिलांवरील अत्याचार, शेतकरीविरोधी धोरणाविरुद्ध आवाज उठवणाऱ्यांवर दडपशाही करीत आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना याच कारणावरून ईडीने नोटीस पाठवली. त्याचा निषेध करण्यासाठी विदर्भातील काँग्रेस नेत्यांनी येथील सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कार्यालयापुढे आंदोलन केले.

सविस्तर वाचा

15:44 (IST) 21 Jul 2022
हैदराबादमध्ये ईडी कार्यालयाजवळ काँग्रेस कार्यकर्त्यांनी पेटवल्या दोन दुचाकी

हैदराबादमधील ईडी कार्यालयाजवळ काँग्रेस कार्यकर्त्यांनी दोन दुचाकी पेटवल्या, सोनिया गांधींच्या ईडी चौकशीविरोधात आंदोलनादरम्यानची घटना

https://twitter.com/ANI/status/1550060725217148928

15:36 (IST) 21 Jul 2022
"सोनिया गांधी इटलीहून आल्या म्हणत..."; अशोक गेहलोत यांचं टीकाकारांना प्रत्युत्तर

अशोक गेहलोत म्हणाले, "सोनिया गांधी इटलीहून आल्या म्हणत तुम्हाला देशातील कुणीच मिळालं नाही का असा प्रश्न विचारला गेला. त्या परदेशी असल्यावरून अनेक 'जुमले' ऐकत आलोय. मात्र, त्या महिलेने ज्या प्रकारे भारतीय संस्कार व संस्कृती जोपासली त्याचा देशातील महिलांना आदर आहे."

https://twitter.com/INCIndia/status/1550050451478945792

15:14 (IST) 21 Jul 2022
सोनिया गांधींवरील ईडी कारवाईविरोधात तेलंगणातही काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर

सोनिया गांधींवरील ईडी कारवाईविरोधात तेलंगणातही काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर, हातात झेंडे, पोस्ट घेत मोदी सरकारचा निषेध, ईडी सोनिया गांधींना लक्ष्य करत असल्याचाही आरोप

https://twitter.com/INCIndia/status/1550052965402157059

15:09 (IST) 21 Jul 2022
औरंगाबादमध्येही काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींच्या ईडी चौकशीविरोधात आंदोलन

औरंगाबादमध्येही काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींच्या ईडी चौकशीविरोधात आंदोलन, मोदी सरकारवर दडपशाहीचा आरोप करत कार्यकर्ते रस्त्यावर, घोषणाबाजी करत केंद्र सरकारचा निषेध

https://twitter.com/INCMaharashtra/status/1550044907632721920

15:03 (IST) 21 Jul 2022
सोनिया गांधींवरील ईडी कारवाईविरोधात काँग्रेसचं नाशिकमध्ये आंदोलन

सोनिया गांधींवरील ईडी कारवाईविरोधात काँग्रेसचं नाशिकमध्ये आंदोलन, आमदार बाळासाहेब थोरातांसह अनेक काँग्रेस नेते उपस्थित, केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरून विरोधकांची मुस्कटदाबी केल्याचा मोदी सरकारवर आरोप

https://twitter.com/INCMaharashtra/status/1550046175843459073

15:00 (IST) 21 Jul 2022
विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खरगे, शशी थरूरांसह ७५ खासदार पोलिसांच्या ताब्यात

सोनिया गांधींवरील ईडी कारवाईविरोधात दिल्लीतही काँग्रेसने आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खरगे, खासदार शशी थरूरांसह ७५ खासदारांना ताब्यात घेतलं.

https://twitter.com/ani_digital/status/1550032569651310593

14:30 (IST) 21 Jul 2022
सोनिया गांधींच्या ईडी चौकशीविरोधात काँग्रेसचं चेन्नईतही आंदोलन

काँग्रेस कार्यकर्त्यांचं सोनिया गांधींच्या ईडी चौकशीविरोधात तामिळनाडूतील चेन्नई येथेही आंदोलन, घोषणाबाजी करत मोदी सरकारचा निषेध, शंख, घंटानाद करत आंदोलन

https://twitter.com/ANI/status/1550039527833862144

14:25 (IST) 21 Jul 2022
सोनिया गांधींच्या ईडी चौकशीविरोधात नागपुरातही काँग्रेसचं आंदोलन

सोनिया गांधींच्या ईडी चौकशीविरोधात नागपुरातही काँग्रेसचं आंदोलन, आमदार सुनिल केदार, विकास ठाकरे यांच्यासह अनेक नेते उपस्थित, मोदी सरकारवर केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरुन खुलेआम दडपशाही केल्याचा आरोप

https://twitter.com/SunilKedar1111/status/1550028463108632577

14:21 (IST) 21 Jul 2022
सोनिया गांधींवरील ईडी कारवाईविरोधात काँग्रेसचं पुण्यातही आंदोलन

मोदी सरकारवर केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करुन दडपशाही केल्याचा आरोप करत काँग्रेसचं पुण्यात आंदोलन, काँग्रेस आमदार पृथ्वीराज चव्हाण, आमदार सतेज पाटील, विश्वजीत कदम, प्रणिती शिंदे व इतर नेते उपस्थित

https://twitter.com/INCMaharashtra/status/1550026850348548097

13:37 (IST) 21 Jul 2022
नाना पटोले, भाई जगताप, झिशान सिद्दिकींसह काँग्रेसचे अनेक नेते पोलिसांच्या ताब्यात

आंदोलक काँग्रेस कार्यकर्त्यांवर पोलिसांची कारवाई, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप, काँग्रेस आमदार झिशान सिद्दिकींसह अनेक कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

https://twitter.com/INCMaharashtra/status/1550025045472382976

13:23 (IST) 21 Jul 2022
मुंबई काँग्रेस आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसतर्फे ईडी कार्यालयावर निषेध मोर्चा

https://twitter.com/INCMaharashtra/status/1549996439144505347

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांची ईडी चौकशी होत असल्याने काँग्रेसने केंद्र सरकारविरोधात आंदोलन करण्यात येत आहे. मोदी सरकारची ईडी दडपशाही व जनविरोधी निर्णयांविरोधात आवाज उठविणाऱ्या सोनिया गांधींची चौकशी करत आहे, असंही काँग्रेसने म्हटलंय. ईडी कारवाईच्या निषेधार्थ काँग्रेसतर्फे देशभरात आंदोलनं करण्यात येत आहेत. नाना पटोले (अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस), भाई जगताप (अध्यक्ष मुंबई काँग्रेस), अशोक चव्हाण (माजी मुख्यमंत्री), चरणसिंग सप्रा (कार्याध्यक्ष, मुंबई काँग्रेस) यांच्यासह या निषेध मोर्चामध्ये काँग्रेसचे प्रमुख नेते, आजी माजी आमदार, खासदार, माजी मंत्री, माजी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.

13:12 (IST) 21 Jul 2022
काँग्रेस नेत्यांचा पक्ष मुख्यालयापासून संसदेपर्यंत मोर्चा

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या ईडी चौकशी विरोधात काँग्रेस नेते आणि खासदारांनी दिल्लीतील अकबर रोड येथील पक्षाच्या मुख्यालयापासून संसदेपर्यंत मोर्चा काढला आहे.

13:12 (IST) 21 Jul 2022
नेमकं प्रकरण काय?

नॅशनल हेराल्ड प्रकरणात सुब्रमण्यम स्वामी यांनी सोनिया गांधी, राहुल गांधी, दिवंगत नेते मोतीलाल व्होरा, पत्रकार सुमन दुबे आणि टेक्नोक्रॅट सॅम पित्रोदा यांच्यावर आरोप केले होते. यंग इंडिया लिमिटेडच्या माध्यमातून ते चुकीच्या पद्धतीने विकत घेतले गेले आणि काँग्रेस नेत्यांनी २,००० कोटी रुपयांपर्यंतची मालमत्ता जप्त केल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रकरणाचा तपास ईडीने २०१४ मध्ये सुरू केला होता. यंग इंडिया लिमिटेडचा उद्देश नफा कमावणे हा नसून ती चॅरीटीसाठी स्थापन करण्यात आली आहे, असे या प्रकरणावर काँग्रेसचे म्हणणे आहे.

13:06 (IST) 21 Jul 2022
सोनिया गांधींना ‘ईडी’ने चौकशीसाठी बोलवल्याच्या निषेधार्थ, पुण्यात काँग्रेसचे आंदोलन

पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालय बाहेर देखील केंद्र सरकार विरोधात काँग्रेसच्यावतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री विश्वजीत कदम, सत्तेज पाटील, आमदार प्रणिती शिंदे, पुणे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्यासह पक्षाचे आजीमाजी पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. वाचा सविस्तर बातमी...

Sonia Gandhi's ED Appearance Live

नॅशनल हेराल्ड प्रकरण सोनिया गांधी ईडी लाइव्ह