कोल्हापुरात रंगणार पाटील विरुद्ध महाडीक सामना; सतेज पाटलांनी शक्तीप्रदर्शन करत दाखल केला उमेदवारी अर्ज

कोल्हापुरात स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद मतदार संघातून काँग्रेसचे उमेदवार गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला

Congress, Satej Patil, Vidhan Parishad, Kolhapur
कोल्हापुरात स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद मतदार संघातून काँग्रेसचे उमेदवार गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला

कोल्हापुरात स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद मतदार संघातून काँग्रेसचे उमेदवार गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. या निमित्ताने सतेज पाटील यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. कोल्हापूर विधान परिषदेची निवडणूक काँग्रेस उमेदवार सतेज पाटील आणि भाजपचे माजी आमदार अमल महाडिक यांच्यात होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल होण्यास सुरुवात झाली तरी अद्याप एकही अर्ज दाखल झाला नव्हता.

गुरुवारी सतेज पाटील यांनी पहिला अर्ज भरला. त्यांच्यासमवेत राष्ट्रवादीचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, शिवसेनेचे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर,काँग्रेसचे आमदार पी. एन. पाटील आदी होते. याचबरोबर काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेचे प्रमुखही यावेळी एकत्र होते. त्यानंतर धैर्यशील हॉल येथे महाविकास आघाडीचा मेळावा होऊन सतेज पाटील यांच्या विजयाचा निर्धार करण्यात आला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Congress satej patil files nomination for vidhan parishad in kolhapur sgy

Next Story
‘बुद्धिस्ट सर्किट’ विकासातून पर्यटनास चालना
ताज्या बातम्या