“तो एबी फॉर्म योग्यच”; सत्यजित तांबेंच्या आरोपांवर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, पुरावेही केले सादर

सत्यजित तांबेंच्या आरोपांवर काँग्रेसने पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

nana patole and satyajit tambe

काँग्रेसचे बंडखोर नेते आणि नवनिर्वाचित अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांनी निवडणूक जिंकल्यानंतर अनेक गौप्यस्फोट केले आहेत. काँग्रेस पक्षाने आपल्याला चुकीचे एबी फॉर्म दिले, असा आरोप सत्यजित तांबे यांनी केला आहे. यावेळी त्यांनी त्यांना दिलेले कथित एबी फॉर्म पत्रकार परिषदेत पुरावे म्हणून दाखवले आहेत. सत्यजित तांबेंच्या या आरोपांनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

यावर आता काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सत्यजित तांबे यांनी केलेला आरोप फेटाळून लावला आहे. सत्यजित तांबेंना दिलेला अर्ज योग्यच होता, असं अतुल लोंढे म्हणाले. पुरावा म्हणून त्यांनी व्हॉट्सअॅपवर झालेल्या चॅटींगचा एक स्क्रीनशॉट सादर केला आहे. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन संबंधित आरोप फेटाळून लावले आहेत.

हेही वाचा- “पक्षाने चुकीचे एबी फॉर्म दिले,” सत्यजित तांबेंचा गौप्यस्फोट! पत्रकार परिषदेतच दिले पुरावे

सत्यजित तांबेंच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना अतुल लोंढे म्हणाले, “आरोप म्हणण्यापेक्षा त्यांनी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला आहे.स्पष्टीकरण देताना त्यांनी खोटे आरोप केले आहेत. हे अतिशय क्लेशदायक आहे. ते जिंकले सगळ्यांनी त्यांचं अभिनंदन केलं. पण ज्या काही गोष्टी घडल्या त्या कशामुळे घडल्या? याचं उत्तर मात्र त्यांनी दिलं नाही. त्यांनी आरोप केला की, अमरावती आणि नागपूरचे एबी फॉर्म दिले होते. पण त्यांना जे फॉर्म पाठवले होते, ते फॉर्म बाळासाहेब थोरात यांचे सहकारी सचिन गुंजाळ यांच्याद्वारे पाठवले होते. त्याचे स्क्रीनशॉटही त्यांना पाठवले होते, व्हॉट्सअॅपवर त्यांचा ‘ओके’ असा रिप्लाय आला आहे, हे कोरे एबी फॉर्म आहेत, याचे पुरावे आमच्याकडे आहेत.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-02-2023 at 19:29 IST
Next Story
सांगली : राज ठाकरेंविरोधात शिराळा न्यायालयाचे अजामीनपात्र वॉरंट
Exit mobile version