किरीट सोमय्यांवर एक रुपयाचा दावा दाखल करणार, काँग्रेस प्रवक्त्याने दिली माहिती

दोन कवडीचा दावा करता येत नाही म्हणून एक रुपयाचा दावा दाखल करणार, असंही या नेत्याने म्हटलं आहे.

kirit Somayya

“भारतीय जनता पक्षाचे नेते व माजी खासदार किरिट सोमय्या हे वारंवार काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना नेत्यांच्याविरोधात गरळ ओकत असतात. बिनबुडाचे आरोप करुन नाहक बदनामी करत असतात. सोमय्या यांच्या बेताल व बिनबुडाच्या वक्तव्याप्रकरणी आता त्यांच्याविरोधात कोर्टात सिव्हिल आणि क्रिमिनल याचिका दाखल करणार आहे”, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दिली आहे.

पत्रकारांशी बोलताना अतुल लोंढे म्हणाले, “किरीट सोमय्या यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीवर बोलताना वसुलीच्या पैशातील ४० टक्के शिवसेना, ४० टक्के राष्ट्रवादी काँग्रेस व २० टक्के काँग्रेसला मिळतो असा धादांत खोटा आरोप करून काँग्रेस पक्षाची बदनामी केली आहे. सोमय्या यांच्या या बेताल, बिनबुडाच्या आरोपाविरोधात आता त्यांच्या विरोधात कोर्टात तक्रार दाखल करणार असून दोन कवडीचा दावा दाखल करता येत नाही म्हणून १ रुपयाचा दावा दाखल करणार आहे”.

ते पुढे म्हणाले, “सतत खोट्या आरोपांची राळ उडवून महाराष्ट्र विकास आघाडीच्या नेत्यांना बदनाम करण्याचे काम सोमय्या करत आहेत. स्वतःच तपास अधिकारी व स्वतःच न्यायाधीश असल्याच्या आविर्भात त्यांची असंबंध बडबड सुरु असते. त्यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या असून या बेताल बडबडण्याला चाप बसला पाहिजे म्हणून दिडदमडीच्या सोमय्यांची जेवढी लायकी आहे तेवढ्याच किमतीचा म्हणजे एक रुपयाचा दावा दाखल करणार आहे”.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Congress spokesperson atul londhe will file complaint of 1 rs on kirit somayya vsk

Next Story
नाकर्त्यां लोकप्रतिनिधींमुळे पूरग्रस्त अन्नछत्रात!
ताज्या बातम्या