शिवप्रताप दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह काही मंत्री प्रतापगडावर गेले होते. या ठिकाणी विविध कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, या ठिकाणी भाषण करताना भाजपाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केलेल्या एका विधानाने आणखी एक नवा वाद निर्माण झाला आहे. यावर कालापासून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. विरोधी पक्ष नेत्यांकडून जोरदार टीक होत आहे. या पार्श्वभूमीवर आज काँग्रेस प्रदेशाध्य नाना पटोलेंनीही भाजपावर जोरदार टीका केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पत्रकारपरिषदेत बोलताना पटोले म्हणाले, “मुद्दा असा आहे की यांची जीभ कशी वळते?, महाराष्ट्रात नव्हे तर देशात छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल असं वक्तव्य असं करावं यासाठी यांची जीभ कशी वळते? यानंतर माफी मागावी. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन हे सत्तेत आले, शिवाजी महाराजांचं नाव घेऊन सत्तेत यायचं आणि त्यांचाच अवमान करायचा हा भाजपा कोणी अधिकार दिला. हा प्रश्न या राज्यातील जनता आणि काँग्रेस विचारते आहे. अगोदर बोलायचं आणि नंतर माफी मागायची जशी इंग्रजांची पद्धत अगोदर मारायचं आणि नंतर माफी मागायची हे महाराष्ट्र खपवून घेणार नाही. एवढंच त्यांना वाटत असेल तर तातडीने राजीनामा द्यावा. अशी भूमिका आमची आहे, यांना माफी नाही.”

याशिवाय, “शिवाजी महाराजांच्या विचारांत गद्दारांना कधीच माफी नव्हती, महाराष्ट्रातील जनता हीच भूमिका घेऊन लढते आहे. या भावना जर या लोकांनी लक्षात घेतल्या नाहीत, तर त्यांना निश्चितच महाराष्ट्रातील जनता धडा शिकवल्याखेरीज राहणार नाही.” असंही पटोले म्हणाले.

मंगलप्रभात लोढा नेमकं काय म्हणाले?-

सातारा जिल्ह्यातील प्रतापगडावर आज शिवप्रतापदिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या वक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. या कार्यक्रमात भाषण करताना लोढा यांनी एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत केलेल्या बंडाची थेट शिवरायांच्या आग्र्यातील सुटकेशी तुलना केली. “शिवराय आग्र्यातून बाहेर पडले, तसेच शिंदे बाहेर पडले. औरंगजेबाने शिवरायांना रोखलं तसंच शिंदेंनाही कुणीतरी रोखलं होतं. शिवराय स्वराज्यासाठी बाहेर पडले, तर शिंदे महाराष्ट्रासाठी”, असं विधान लोढा यांनी केलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress state president nana patoles criticism of mangalprabhat lodhas statement about chhatrapati shivaji maharaj msr
First published on: 01-12-2022 at 15:22 IST