राज्य मागासवर्ग आयोगाच्या मुद्दय्यावरून भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावर निशाणा साधला आहे. तसंच विडय वडेट्टीवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केवळ वाहवा मिळवण्यासाठी मागासवर्ग आयोगासाठी ४५० कोटींची घोषणा केली असल्याचाही आरोप केला आहे. गोपीचंद पडळकरांकरुन होणाऱ्या टीकेला विजय वडेट्टीवार यांनी उत्तर दिल असून ‘नया नया पंछी ज्यादा फड़फड़ करता है’ असं म्हणत टोला लगावला. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

“ज्याच्यावर लुटमारीचे, फसवणुकीचे, लोकांची शेती चोरल्याचे, अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल आहेत अशा माणसाबद्दल काही बोलायचं नाही. ते नवे आहेत, नव्या पक्षाप्रमाणे ते फडफडत आहेत. त्यांच्या खात्यात पाच कोटी दिले असून काय करायचं हा त्यांचा अधिकार आहे. त्यांना परवानची काही गरज नाही. अर्धवट माहितीच्या आधेर ते बोलत आहेत,” अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

eknath shinde devendra fadnavis
महायुतीत वादाची ठिणगी? भाजपा आमदार शिंदे गटातील खासदारावर टीका करत म्हणाले, “भ्रष्टाचाऱ्यांना…”
Ayodhya darshan lured by Yogi Adityanath Claims to make all arrangements for the visitors
योगी आदित्यनाथ यांच्याकडून अयोध्या दर्शनाचे आमिष! दर्शनाला येणाऱ्यांची सर्व व्यवस्था करण्याचा दावा
Why Are the Rajput community angry at the statement of Union Minister Rupala
गुजरातमध्ये भाजपच्याच नेत्यामुळे भाजप अडचणीत? केंद्रीय मंत्री रुपाला यांच्या विधानावर रजपूत समाज संतप्त का?
vijay shivtare
निनावी पत्राद्वारे शिवतारेंच्या माघारीवर टीका; पवारांच्या विरोधातील ५ लाख ८० हजार मतदारांनी करायचे काय?

पडळकर काय म्हणाले आहेत –

गोपीचंद पडळकर यांनी म्हटले आहे की, “ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार व अर्थमंत्री अजित पवार यांनी नुसती वाहवा मिळवत मागासवर्ग आयोगासाठी ४५० कोटींची घोषणा केली. वास्तविक फक्त साडेचार कोटी दिले. पण ते खर्च करण्याचे आदेशही आयोगाला मिळाले नाहीत. ना ऑफिस ना पुर्णवेळ सचिव, आयोगाचे संशोधक सोलापूरात तर आयोग पुण्यात ” तसेच, “वडेट्टीवारांनी टक्केवारीसाठी ‘फुकटचं घावलं आणि गाव सारं धावलं’अशी राज्य मागासवर्गीय आयोगाची अवस्था केली.” अशी टीका भाजपाचे नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

“वडेट्टीवारांनी टक्केवारीसाठी ‘फुकटचं घावलं आणि गाव सारं धावलं’ अशी राज्य मागासवर्गीय आयोगाची अवस्था केली”

याचबरोबर, “ओबीसींच्या नावावर मंत्रीपद भूषवतात आणि प्रस्थापितांसाठी पोपटपंची करतात. आता तर हद्दच झाली उद्याच्या १७ जानेवारीला ओबीसींच्या राजकीय आरक्षणाची सुनावणी आहे आणि त्या करिता ठाकरे सरकारने आयोगाला अंतिरम अहवाल मागितला होता. पण आयोगाचे कामच सुरू नाही झाले तर अहवाल कसा देणार? आणि म्हणूनच दिशाभूल करण्यासाठी लगबगीने वडेट्टीवारांनी तीन महिन्याची मुदत न्यायालयाला मागणार, असे जाहीर केले.” असा देखील पडळकर यांनी यावेळी आरोप केला.

याशिवाय, “याचा अर्थ महाराष्ट्रात येऊ घातलेल्या निवडणुकीत ओबीसींना राजकीय आरक्षण राहणार नाही आणि प्रस्थापित ओबीसींच्या राजकीय हक्कावरती डल्ला मारणार. म्हणून समस्त ओबीसी बांधवांना आवाहनही करतो की तुमच्या जीवावरती लालदिवा मिळवणारे आणि आपल्यालाच फसवणाऱ्या ओबीसी मंत्र्यांना जिथे भेटेल तिथे गाठा आणि जाब विचारा.” असं आवाहन गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे.