उद्धव ठाकरे कधीही मुख्यमंत्री होणार नाहीत- नारायण राणे

उद्धव ठाकरे कधीही मुख्यमंत्री होणार नाहीत, असा टोला त्यांनी लगावला आहे.

नारायण राणे यांनी रविवारी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. उद्धव ठाकरे कधीही मुख्यमंत्री होणार नाहीत, असा टोला त्यांनी लगावला आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर रविवारी काँग्रेस पक्षाकडून येत्या १७ सप्टेंबर रोजी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. काँग्रेसच्या विधानसभा प्रचारसमितीचे प्रमुख नारायण राणे यांनी कणकवली येथे झालेल्या पत्रकारपरिषदेत ही माहिती दिली. याशिवाय नारायण राणेंनी स्वत: कुडाळ मतदारसंघातून तर नितेश राणे कणकवली मतदारसंघातून लढणार असल्याचे जाहीर केले.  

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Congress will announce first candidate list on 17th september for maharashtra assembly polls