“तो लुटायलाच आला आहे, पण जगासमोर मसीहा…”; मनी हाईस्टच्या निमित्ताने यशोमती ठाकूर यांचं सूचक ट्विट

यशोमती ठाकूर यांनी नामोल्लेख न करता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीवर टीका केली आहे

सध्या सगळीकडेच ‘मनी हाइस्टची’ चर्चा सुरु आहे. सोशल मीडियावर अनेकजण ‘मनी हाइस्ट’संबंधी पोस्ट शेअर करत आहेत. दरम्यान सध्या सोशल मीडियावर अशाच एका पोस्टची चर्चा रंगली आहे. पण या पोस्टला थोडी राजकीय बाजू आहे. राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी ही पोस्ट केली असून चांगलीच चर्चा रंगली आहे. या ट्विटमध्ये यशोमती ठाकूर यांनी नामोल्लेख न करता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीवर टीका केली आहे.

“तो देश लुटायलाच आला आहे. मात्र असे दाखवत आहे जसं की तो मसीहा आहे, हे मी कोणाबद्दल बोलत नाही तर मनी हाईस्ट या नव्या वेब सिरीजबद्दल बोलत आहे. कुणाबद्दल हे वाटल्यास तो केवळ योगायोग समजावा,” असं ट्वीट यशोमती ठाकूर यांनी केलं आहे.

यशोमती ठाकूर सातत्याने भाजपाची कार्यपद्धती, देशातील बेरोजगारी, महागाई आणि गेल्या काही दिवसात सातत्याने वाढ होत असलेली गॅस पेट्रोल डिझेल या इंधनाची दरवाढ या विषयांवरुन केंद्र सरकार आणि नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती टीका करत आहेत. यावेळी त्यांनी मोदींचा उल्लेख न करता अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. सोशल मीडियावर या ट्वीटची जोरदार चर्चा सुरू आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Congress yashomati thakur tweet money heist pm narendra modi sgy

ताज्या बातम्या