अधिकाराचा वापर करून माहिती विचारणारा आणि देणारा यांच्यात योग्य समन्वय असणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन विवेक वेलणकर यांनी केले. आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने ‘माहितीचा अधिकार अधिनियम २००५’ या विषयावर वेलणकर यांचे व्याख्यान आयोजित केले होते. वेलणकर यांनी माहिती कशा पद्धतीने आणि कोणत्या स्वरूपात देणे आवश्यक आहे, अधिनियमनातील कलमांमध्ये उल्लेख केलेल्या तरतुदी, माहिती अधिकारी आणि साहाय्यक माहिती अधिकारी यांचे अधिकार आणि जबाबदाऱ्या, माहिती अधिकाराची पाश्र्वभूमी तसेच माहिती अधिकार हा कोणाला लागू होतो याविषयी मार्गदर्शन केले. कुलगुरू प्रा. डॉ. अरुण जामकर यांनी माहिती अधिकाराबाबत सर्वसामान्यांमध्ये जागरूकता नसल्यामुळे संभ्रमावस्था निर्माण झाल्याचे दिसते असे मत व्यक्त केले. शासकीय कार्यालयांमधील कामकाजाविषयी माहिती विचारण्याचा सर्वाना अधिकार आहे. माहिती अधिकाराचा गैरवापर होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. कुलसचिव डॉ. आदिनाथ सूर्यकर यांनी आभार मानले. सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी स्वप्निल तोरणे यांनी केले. कार्यक्रमांचे आयोजन जनमाहिती अधिकारी डॉ. आर. टी. आहेर, आर. एस. कापसे, युवराज भारंबे यांनी केले होते.

Loksatta samorchya bakavarun Congress bjp Declaration Important to the people Purpose of the issues
समोरच्या बाकावरून: माझे मत त्याच उमेदवाराला, जो…
Violation of Right to Information by Regional Psychiatric Hospital in Nagpur
नागपुरातील प्रादेशिक मनोरुग्णालयाकडून माहिती अधिकाराचा भंग, सामाजिक कार्यकर्ते म्हणतात…
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…
Transfer of a railway official for answering RTI queries Mumbai
माहिती अधिकाराचे उत्तर दिल्याने, रेल्वे अधिकाऱ्याची बदली