बीड : करोना विषाणू बाधितांची आटोक्यात आलेल्या संख्येत पुन्हा मोठी वाढ होऊ लागली आहे. शुक्रवारी दिवसभरात २९५ नवीन रुग्णांची नोंद झाली असून तीन दिवसांमध्ये तब्बल साडेसातशे बाधित आढळले आहेत. बाधितांचे प्रमाण १२.३९ टक्क्यांवर गेले असून सध्या १ हजार १२९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांचाच अधिक समावेश आहे. जिल्ह्यात शुक्रवारी प्रशासनाला प्राप्त २ हजार ३८१ अहवालात २९५ करोनाबाधित आढळले आहेत. त्यामध्ये बीड तालुक्यात सर्वाधिक ११३, परळी ५९, अंबाजोगाई ३६, आष्टी १३, धारुर ११, केज २०, माजलगाव १८, गेवराई ९, पाटोदा ३, शिरुर ७ तर वडवणी तालुक्यातील सहा रुग्णांचा समावेश आहे. नागापूर (ता. बीड) या गावात एकाच वेळी तेरा जणांना करोनाची लागण झाली आहे. ग्रामीण भागातील रुग्णवाढ आरोग्य यंत्रणेसाठी चिंतेचा विषय ठरू लागली आहे. तीन दिवसांपासून सातत्याने रुग्णवाढ होऊ लागली असून तब्बल साडेसातशे बाधित आढळून आले आहेत. सध्या १ हजार १२९ रुग्णांवर ठिकठिकाणचे रुग्णालय, कोविड काळजी केंद्रात उपचार सुरू आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रुग्ण वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेने सामाजिक न्याय विभागाचे वसतिगृह ताब्यात घेतले असुन त्या ठिकाणी कोविड काळजी केंद्र सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यात बाधितांचे प्रमाण १२.३९ टक्क्यांवर गेले आहे. करोनाच्या तिसऱ्या लाटेत तरुण वर्ग संसर्गाच्या विळख्यात सापडला असून मागील वीस दिवसांमध्ये निष्पन्न एकूण रुग्णांपैकी ३९ टक्के रुग्ण १८ ते ३५ वयोगटातील आहेत. विषाणू संसर्गापासून बचावासाठी प्रतिबंधात्मक लसीकरणही आवश्यक असून १८ ते ४५ वयोगटातील १४ लाख १४ हजार जणांनी करोना प्रतिबंधक मात्रा घेतली आहे. तर १५ ते १७ वयोगटातही ७५ हजारांपेक्षा अधिक युवकांचे लसीकरण करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Corona affected seven hundred patients ysh
First published on: 22-01-2022 at 00:02 IST