“करोना हा फर्जीवाडा, WHO चे डॉक्टर, वैज्ञानिक फर्जी; डॉक्टरांनीच लोकांना मारुन त्यांचे अवयव विकले”

“अमेरिकेत रेमडिसिव्हरवर बंदी आहे तर भारतात हे इंजेक्शन का दिले गेले, तसेच नंतर ते पण बंद पण करण्यात आले?”

coronavirus
करोनासंदर्भात अनेक गंभीर आरोप आणि दावे करण्यात आलेत. (प्रातिनिधिक फोटो सौजन्य रॉयटर्स)

दक्षिण आफ्रिकेत सर्वप्रथम सापडलेल्या ‘ओमायक्रॉन’ या करोनाच्या नव्या उत्परिवर्तित विषाणूने जगभरात पाय पसरायला सुरुवात केली असून अनेक देशांमध्ये रुग्णसंख्येत वाढ होत आहे. अनेक देशांनी आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद केल्या आहेत. करोनाच्या अन्य उत्पादित विषाणूपेक्षा ओमायक्रॉन अधिक चिंताजनक असल्याबाबत संशोधकांनी मात्र अद्याप कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. एकीकडे ओमायक्रॉनसंदर्भातील चिंता वाढत असतानाच दुसरीकडे आज सांगलीमध्ये कालीपुत्र कालीचरण महाराज यांनी करोना हा आजारच पूर्णपणे फर्जीवाडा असल्याचा दावा केलाय. इतकच नाही तर जागतिक आरोग्य संघटनेचे डॉक्टर, वैज्ञानिक आणि कर्मचारी हे फर्जी असल्याचंही ते म्हणालेत.

नक्की वाचा >> ‘ओमिक्रॉन’बद्दल उगाच भीती निर्माण केली जातेय?; पहिल्यांदा इशारा देणाऱ्या दक्षिण आफ्रिकन महिला डॉक्टर म्हणतात, “अनेक रुग्ण तर…”

“करोना हा फर्जीवाडा आहे. जागतिक आरोग्य संघटनासुद्धा फर्जीवाडा संस्था आहे. त्यांचे डॉक्टर, वैज्ञानिक आणि कर्मचारी हे फर्जी आहेत,” असं कालीपुत्र कालीचरण महाराज यांनी म्हटलं आहे. “करोना हा भयानक महामारी नाही. ज्या करोनामुळे लोकांचा मृत्यू झाला त्या लोकांना डॉकटरांनी मारले आहे. किडनी आणि मानवी शरीरातील अवयवांची तस्करी झालेली आहे,” असा धक्कादायक आरोपही कालीपुत्र कालीचरण महाराजांनी केलाय.

“अमेरिकेत रेमडिसिव्हरवर बंदी आहे तर भारतात हे इंजेक्शन का दिले गेले, तसेच नंतर ते पण बंद पण करण्यात आले? करोना हे एक षड्यंत्र आहे,” असंही कालीपुत्र कालीचरण महाराज म्हणालेत.

नक्की वाचा >> ताप आला, कुटुंबाला फोन केला अन्… ‘ती’ व्यक्ती आफ्रिकेमधून डोंबिवलीत येईपर्यंत काय काय घडलं?

“मोदीजींना मी धन्यवाद म्हणून इच्छितो कारण त्यांनी याच काळात राम मंदिर आम्हाला परत केले. ३७० हटवलं. शाहीनबाग उठवली. सीएए आणि एनआरसी लागू केली. या करोनाच्या सर्व काळात भारतातील लोक टिकले ते अध्यात्मावर आणि धर्मावरच्या विश्वासावर. नाहीतर बाकीचे देश कोसळलेले आहेत. मोदीजींना कोटी कोटी धन्यवाद आहेत. त्यांनी हा देश वाचवला,” अशी प्रतिक्रीया कालीपुत्र कालीचरण महाराज यांनी दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Corona is fake doctor killed people to sell their organs claims kaliputra kalicharan maharaj scsg

Next Story
पश्चात्तापाच्या विधानावरून नवाब मलिकांचा फडणवीसांवर निशाणा; म्हणाले, “मला दिसतंय की…!”
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी