|| मोहनीराज लहाडे

नगर : करोनामुळे गेल्या दीड वर्षापासून रखडलेल्या सहकार क्षेत्रातील निवडणुका आता मार्गी लागत आहेत. जिल्ह्याच्या सहकारातील मातब्बरांनी आपापल्या नेतृत्वाखालील सहकारी साखर कारखानदारीची निवडणूक बिनविरोध करण्याची परंपरा कायम ठेवली. काही अपवादात्मक साखर कारखान्यांच्या निवडणुका रंगल्या. मात्र या निवडणुकांतूनही ऊस उत्पादक सभासदांनी प्रस्थापितांच्या, विद्यमान नेतृत्वाच्या बाजूनेच पुन्हा एकदा कौल दिला आहे. सहकारी साखर कारखानदारीतील प्रस्थापितांच्या विरोधातील वैचारिक लढाईच्या परंपरेचा मुद्दाही आता खंडित झाल्याचेही त्यातून अधोरेखित झाले आहे.

Modi, religious polarization, Marathwada,
‘रजाकारी’ला उजाळा देत मराठवाड्यात मोदींचा धार्मिक ध्रुवीकरणावर भर
BJP Workers, Protest Burn Effigy, Outside Vilas Muttemwar s Residence, During Code of Conduct, Muttemwar register complaint, election commission, nagpur code of conduct violation, nagpur news, bjp nagpur,
माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांची भाजपविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार
Loksatta chavdi happening in maharashtra politic news on maharashtra politics
चावडी: तो मी नव्हेच!
UBT leader joins shiv sena shinde group
उबाठा गटाला धक्का, माजी मंत्र्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश; मिलिंद नार्वेकरांवर केले गंभीर आरोप

 सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुकीतील रणधुमाळी आता संपत चालली आहे. या निवडणुकीच्या रणधुमाळीतून  कारखान्याच्या कारभाराचा ऊहापोह होत असे, वैचारिक घुसळून होत असे, नवे नेतृत्व पुढे तयार होई त्यालाही छेद बसला. जेथे अगदीच टोकाचा संघर्ष चाले, वारंवार सत्ताबदल होई, असे राहुरी, जगदंबा (कर्जत), पारनेर असे काही कारखाने बंद पडले. एकमुखी नेतृत्वाखाली कारखाना सक्षम चालवला जाणे सभासदांच्या पसंतीला उतरले आहे.

 यंदाच्या या बिनविरोध निवडणुकीची सुरुवात एकमेकांचे परंपरागत कट्टर विरोधक असलेले ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात व राधाकृष्ण विखे यांनी दोघांच्या नेतृत्वाखालील अनुक्रमे सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना व पद्माश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली. दोघांनीही एकमेकांच्या निवडणुकीत हस्तक्षेप केला नाही. त्यानंतर ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या नेतृत्वाखालील मुळा सहकारी साखर कारखान्याची निवडणूकही बिनविरोध झाली. माजी आमदार चंद्रशेखर घुले व नरेंद्र घुले या बंधुद्वयांनीही राजकीय मुत्सद्दीपणा दाखवत दोन जागा भाजप व शिवसेनेला देत लोकनेते मारुतराव घुले पाटील-ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध घडवून आणली.

 यानंतर झालेली वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूकही सलग चौथ्या वेळी ज्येष्ठ नेते अप्पासाहेब राजळे व त्यांच्या स्नुषा आमदार मोनिका राजळे यांनी बिनविरोध केली. त्यापूर्वी राजळे यांचे परंपरागत विरोधक संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूकही प्रताप ढाकणे यांनी बिनविरोध घडवली. मुळा- ज्ञानेश्वर- वृद्धेश्वर- केदारेश्वर या चारही कारखान्यांचे कार्यक्षेत्र एकमेकांशी संलग्न असले तरीही त्यांनी कधीही एकमेकांच्या निवडणुकीत लक्ष न घालण्याची दूरदृष्टी नेहमीच दाखवली आहे. गडाख-राजळे एकमेकांचे नातलग होतेच. आता गडाख-घुले परस्परांचे सोयरे झाले आहेत.

 अकोल्यातील अगस्ती सहकारी कारखाना, कोपरगावमधील सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखाना व कर्मयोगी शंकरराव काळे कारखान्याच्या निवडणुका नजीकच्या काळात होतील. त्यांची मुदत संपली आहे. अगस्ती कारखान्याला बिनविरोध निवडीची परंपरा नाही. मात्र ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांच्या वर्चस्वाखाली तो आहे. पिचड यांच्या भाजप प्रवेशानंतर कारखान्यात त्यांना संघर्ष करावा लागेल, असे चित्र आहे. कोपरगावमधील काळे-कोल्हे एकमेकांचे कट्टर विरोधक, मात्र एकमेकांच्या कारखान्यात लक्ष न घालता आपले कारखाने बिनविरोध करण्याचे राजकीय कौशल्य ते नेहमीच दाखवतात.

मुरकुटे व नागवडे यांचे वर्चस्व सिद्ध

श्रीरामपूरमधील ज्येष्ठ नेते भानुदास मुरकुटे यांच्या नेतृत्वाखालील अशोक सहकारी साखर कारखाना, राजेंद्र नागवडे यांच्या नेतृत्वाखाली सहकारमहर्षी शिवाजीराव नागवडे कारखाना व माजी आमदार राहुल जगताप यांच्या नेतृत्वाखालील कर्मयोगी कुंडलिकराव जगताप कारखान्याच्या (कुकडी) निवडणुका झाल्या. कुकडी कारखान्याची निवडणूक रंगणार असे चित्र असतानाच अखेरच्या क्षणी माजी आमदार जगताप यांनी राजकीय कौशल्य दाखवत निवडणूक बिनविरोध घडवून आणली. अर्ज मागे घेण्याशिवाय त्यांनी विरोधकांपुढे पर्यायच शिल्लक ठेवला नाही. जगताप यांच्या पत्नी डॉ. प्रणोती यांचा यातून सहकारात प्रवेश झाला. मुरकुटे व नागवडे या दोघांना मात्र निवडणुकांना सामोरे जात आपले वर्चस्व सिद्ध करावे लागले. ८२ वर्षीय मुरकुटे यांची कारखान्यावरील ३५ वर्षांची सत्ता कायम राहिली. मात्र त्यांना शेतकरी संघटना, परंपरागत विरोधक अविनाश आदिक यांच्याशी संघर्ष करावा लागला. त्यातून मुरकुटे यांना कौटुंबिक कलहालाही सामोरे जावे लागले. मात्र विखे गटाचे सहकार्य मिळवण्यात मुरकुटे यशस्वी झाले. श्रीगोंद्यात शिवाजीराव नागवडे यांच्या पश्चात झालेली पहिलीच निवडणूक. राजेंद्र नागवडे यांच्याविरोधात बंड पुकारणाऱ्या त्यांच्या सहकाऱ्यांनी, भाजप नेते, माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या मदतीने निवडणुकीत रंगत आणली. उपमुख्यमंत्री अजित पवार व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मदतीतून नागवडे यांनी निर्विवाद वर्चस्व कायम राखले.