राज्यात आज दिवसभरात १ हजार ६३ रूग्ण करोनामधून बरे झाले असून, ८९२ नवीन करोनाबाधित आढळले आहेत. तर, १६ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ६४,५९,१०८ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७.६ टक्के एवढे झाले आहे.

आता राज्यातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६६,१७,६५४ झाली आहे. तर, राज्यात आजपर्यंत १४०३८८ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,३२,४०,७६९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६६,१७,६५४ (१०.४६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १,४८,७४३ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ९६८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण १४,५२६ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.