रायगड जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात करोनाचे १७ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या २०७ वर पोहोचली. पनवेल मनपा हद्दीत ८, पनवेल ग्रामीण हद्दीत ७ रुग्ण तर अलिबाग येथे १ रुग्ण आढळून आला. चिंताजनक बाब म्हणजे दिवसभरात करोनामुळे चौघांचा मृत्यू झाला आहे. यात पनवेल मनपा हद्दीतील ३ तर ग्रामीण भागातील एका व्यक्तीचा समावेश आहे.

जिल्ह्यातील १,३३५ जणांची करोनाचाचणी करण्यात आली आहे. यातील १,०९३ जणांचे अहवाल नकारात्मक आले. २०७ जणांना करोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. तर ३५ जणांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. ६० रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे सध्या जिल्ह्यात १३९ करोनाबाधित रुग्ण आहेत. यात पनवेल मनपा हद्दीतील ९२, पनवेल ग्रामीण हद्दीतील ३७, उरण मधील ४, श्रीवर्धन मधील १, कर्जत मधील १, अलिबागमधील ३ तर महाडमधील एका रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात करोनामुळे दगावणाऱ्यांची संख्या ८ वर पोहोचली आहे.