राज्यात आज दिवसभरात २ हजार १४८ रूग्ण करोनामधून बरे झाले असून, १ हजार १३० नवीन करोनाबाधित आढळून आले आहेत. याशिवाय, २६ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील करोना संसर्गाची दुसरी लाट आता ओसरली आहे. दररोज आढळणाऱ्या करोनाबाधितांच्या संख्येत घट होत असून, करोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढताना दिसत आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण ६४,४९,१८६ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ९७.५७ टक्के एवढे झाले आहे.

आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६६,०९,९०६ झाली आहे. तर, राज्यात आजपर्यंत १४०१९६ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,२५,५९,१७१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६६,०९,९०६(१०.५७ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १,६७,०६४ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ८९७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण १६,९०५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.