Coronavirus : राज्यात दिवसभरात ३ हजार २९ जण करोनामुक्त ; ६० रुग्णांचा मृत्यू

२ हजार ८४४ नवीन करोनाबाधित आढळले

Corona Maharashtra
राज्यात आज रोजी एकूण ३३,१५९ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. (संग्रहीत)

राज्यात आज दिवसभरात ३ हजार २९ रूग्ण करोनातून बरे झाले असून, २ हजार ८४४ नवीन करोनाबाधित आढळले आहेत. याशिवाय, ६० करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू देखील झाल्याची नोंद झाली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ६३,६५,२७७ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७.२६ टक्के एवढे झाले आहे.

आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६५,४४,६०६ झाली आहे. तर, राज्यात आजपर्यंत १३८९६२ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,८४,२९,८०४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५,४४,६०६ (११.२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,५४,९८५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १,५१४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ३६,७९४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Coronavirus 3 thousand 29 people were cured from coronavirus in a day in the state 60 patients died

ताज्या बातम्या
फोटो गॅलरी