Coronavirus : राज्यात ५ हजार ०३१ नवीन रुग्ण आढळले ; २१६ रूग्णांचा मृत्यू

राज्यात आज ४ हजार ३८० रूग्ण करोनातून बरे झाले आहेत

Coronavirus in maharashtra
राज्यात आज रोजी एकूण ५१,२३८ अॅक्टिव्ह रूग्ण आहेत..(प्रातिनिधिक छायाचित्र)

राज्यात करोना संसर्गाची दुसरी लाट अद्याप ओसरलेली नाही. अजुनही रोज मोठ्यासंख्येने नवीन करोनाबाधित आढळून येत आहेत.  मागील काही दिवसांमध्ये दररोज आढळणाऱ्या करोनाबाधितांपेक्षा करोनामुक्त झालेल्यांची संख्या ही सातत्याने अधिक आढळून आल्यानंतर, आज करोनाबाधितांची संख्या ही करोनातून बरे झालेल्यांपेक्षा काही जास्त आढळून आली आहे. दिवसभरात राज्यात ५  हजार ०३१ नवीन करोनाबाधित आढळले असून, ४ हजार ३८० रूग्ण करोनातून बरे झाले आहेत. तर, २१६ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे.

राज्यात आजपर्यंत ६२,४७,४१४ करोनाबाधित रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७.०४ टक्के एवढे झाले आहे. आता राज्यातील करोनाबाधित रूग्णांची एकूण संख्या ६४,३६,६८० झाली आहे. आतापर्यंत राज्यात १,३६,५७१ करोनाबाधितांचा मृत्यू झालेला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,२८,४०,८०५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४,३७,६८० (१२.२२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,९८,२६४ रुग्ण गृहविलगीकरणात आहेत. तर, २ हजार ३६९ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत. राज्यात आज रोजी एकूण ५० हजार १८३ अॅक्टिव्ह रूग्ण आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Coronavirus 5 thousand 031 new patients found in the state 216 patients died srk