राज्यातील करोना संसर्गाची दुसरी लाट आता ओसरली आहे. दररोज आढळणाऱ्या करोनाबाधितांच्या संख्येत घट होत असून, करोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढताना दिसत आहे. राज्यात आज दिवसभरात १ हजार ९०१ रूग्ण करोनामुक्त झाले असून, ८०९ नवीन करोनाबाधित आढळले आहेत. तर, दहा करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण ६४,५२,४८६ करोनाबाधित रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण(रिकव्हरी रेट) ९७.५९ टक्के एवढे झाले आहे.

आता राज्यातील करोनाबाधित रूग्णांची एकूण संख्या ६६,११,८८७ झाली आहे. तर, आजपर्यंत राज्यात १४०२२६ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,२७,५२,६८७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६६,११,८८७ (१०.५४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १,६०,४३२ व्यक्ती गृहविलगिकरणता आहेत. तर ९३३ व्यक्ती संस्थात्मक विलगिकरणात आहेत. राज्यात आज रोजी एकूण १५,५५२ अॅक्टिव्ह रूग्ण आहेत.