राज्यात आज दिवसभरात ९४२ रूग्ण करोनामुक्त झाले आहेत, तर ६७८ नवीन करोनाबाधित आढळले आहेत. याशिवाय, ३५ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ६४,८३,४३५ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ९७.७१ टक्के एवढे झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६६,३५,६५८ झाली आहे. तर, राज्यात आजपर्यंत १४०९९७ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,५५,११,३९४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६६,३५,६५८ (१०.१३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ८३,४२१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ९६३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ७,५५५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coronavirus 942 patients coronavirus free in the state during the day msr
First published on: 30-11-2021 at 22:29 IST