“काल रात्री थोडी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. अस्वस्थतात होती. त्यात मी आज सकाळी आलो असतो, तर आता काय सांगणार, छातीत धस्स झालं असतं. त्यामुळे सकाळी आलो नाही. आज मी काही नकारात्मक सांगणार नाहीय. तुम्हाला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देण्यासाठी आलो आहे” असे मख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

“जनतेला आता संकटाच्या गांभीर्याची कल्पना आली आहे आतापर्यंत आपण नकारात्मक बघत होता. घराबाहर पडू नका हे, मी आधीच सांगितलं आहे. करोनाची तुलना मी जागतिक युद्धाशी केली आहे. शत्रू समोर नसतो तेव्हा संकट मोठं असतं असे उद्धव ठाकरे म्हणाले. सध्या सर्वच बंद, लॉकडाउन असल्यामुळे बऱ्याचवर्षांनी कुटुंब एकत्र आली आहेत” असे उद्धव ठाकरे म्हणाले.

“जीवनावश्यक वस्तूंची कुठलीही कमतरता निर्माण होणार. औषधे, भाजीपाल, पशूखाद्य, दूध हे सर्व सुरळीत सुरु राहील. आपल्याकडे अन्नधान्याचा पुरेसा साठा आहे” हे त्यांनी पुन्हा सांगितले.

करोना व्हायरस हा छुपा शत्रू आहे, तो कुठून हल्ला करेल हे सांगता येत नाही. घराबाहेर पाऊल आपण टाकलं तर शत्रू आपल्या घरात पाऊल टाकेल हे विसरु नका. या करोनाला हरवण्याा संकल्प करा असं आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

घरांमधले एसी बंद करण्यासंबंधीचे निर्देश केंद्राकडून आले आहेत. आम्ही त्यांना सांगितलं की ते तर आम्ही केव्हाच सुरु केलं आहे. मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो आहे, घरातले एसी बंद ठेवा आणि दारं खिडक्या उघड्या ठेवा. चला हवा येऊ द्या, कारण असं केल्याने करोनाचा प्रादुर्भाव थांबवता येईल.