Coronavirus : राज्यात दिवसभरात ३ हजार ९३३ रूग्ण करोनामुक्त; रिकव्हरी रेट ९७.२३ टक्के

आज राज्यात ३ हजार २८६ नवीन करोनाबाधित आढळले आहेत.

corona update
राज्यात आज रोजी एकूण २८,६३१ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. (प्रातिनिधिक छायाचित्र)

राज्यात दिवसेंदिवस करोनातून बरे होणाऱ्यांची संख्या हळूहळू वाढताना दिसत आहे. मात्र, अद्यापही दररोज नवीन करोनाबाधित आढळून येत असून, करोनमधून मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येतही भर पडतच आहे. दररोज आढळणारी करोनाबाधितांची संख्या ही करोनातून बरे होत असलेल्यांच्या तुलनेत कधी कमी तर कधी जास्त आढळून येत आहे. आज दिवसभरात राज्यात ३ हजार ९३३ करोनामधून बरे झाले असून, ३ हजार २८६ नवीन करोनाबाधित आढळले आहेत. याशिवाय, ५१ करोनाबाधितांच्या मृत्यूची देखील नोंद झाली आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण ६३,५७,०१२ करोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण(रिकव्हरी रेट) ९७.२३ टक्के एवढे झाले आहे.

आता राज्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या ६५,३७,८४३ झाली आहे. राज्यात आजपर्यंत १३८७७६ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. तर, सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,७८,१९,३८५ प्रयोगाशाळा नमुन्यांपैकी ६५,३७,८४३ (११.३१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,५८,६५३ व्यक्ती संस्थात्मक विलगिकरणात आहेत. तर, १ हजा ४६२ व्यक्ती संस्थात्मक विलगिकरणात आहेत. राज्यात आज रोजी एकूण ३८,४९१ अॅक्टिव्ह रूग्ण आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Coronavirus during the day 3 thousand 933 patients were cured from corona in the state msr

फोटो गॅलरी