करोना व्हायरसच्या तडाख्यामुळे सध्या जगभरात भीतीचे वातावरण आहे. लाखो लोकांना करोना व्हायरसचा फटका बसला आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या व्हायरसशी झुंज देत आहे. विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. डॉक्टर आणि रूग्णालयातील इतर सहकाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे जवळपास लाखभर लोक करोनातून पूर्णपणे बरे झाले असल्याची माहिती आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी अखेर संपूर्ण लॉकडाउनची घोषणा केली.

Big Bazaar देणार ‘लॉकडाउन’ काळात ‘होम डिलिव्हरी’; पाहा तुमच्या विभागातला फोन नंबर…

राज्यासह देशभरात लॉकडाऊन जारी केला गेला, तरीही नागरिकांकडून त्याचे अद्याप गांभिर्याने पालन करण्यात येत नसल्याचे दिसते आहे. काही ठिकाणी कलम १४४ लावूनही त्याचा सर्रास भंग केला जात आहे. त्यामुळे आता पोलिसही आक्रमक झाले असून विनाकारण बाहेर पडणाऱ्यांना ते दंडुकाचा चोप देताना दिसत आहेत. मात्र, आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाहेर पडणाऱ्या ‘लोकांशी सौम्यपणे वागा, त्यांच्यावर थेट लाठीमार करू नका’, असे निर्देश राज्य पोलीस आणि शहर पोलिसांना दिले आहेत.

COVID-19 : T20 World Cup जिंकवून देणारा क्रिकेटपटू बजावतोय पोलिसाचं कर्तव्य

करोनाचा फैलाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून अनेक उपाय करण्यात आले आहेत, तसेच निर्बंधदेखील लादण्यात आसे आहेत. राज्यात संचारबंदी लागू करून या काळात कुणीही घराबाहेर पडू नका, असे आदेशही देण्यात आले आहेत. मात्र, तरीही काही लोक विनाकारण घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे अखेर पोलीस यंत्रणेला या लोकांना दंडुकांचा प्रसाद देणे भाग पडते आहे. याबाबतचे काही व्हिडीओही व्हायरल झाले आहेत.

COVID-19 : सानिया मिर्झा करणार हातावर पोट असणाऱ्यांना आर्थिक मदत

पोलिसांच्या या लाठीमार प्रकाराबाबत जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी यांनी राज्याचे मुख्य सचिव अजॉय मेहता यांच्याकडे तक्रार केली. जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणारे ट्रक अडवले गेले. तसंच पेट्रोल पंपही बंद करण्यात आले असल्याची बाब त्यांनी निदर्शनास आणून दिली. तसेच काही ठिकाणी पोलीस लोकांना चोप देताना व्हिडिओमध्ये दिसत असल्याचेही दाखवून दिले. त्यानंतर मेहता यांनी सचिवांसोबत झालेल्या आढावा बैठकीत या सर्व बाबी निदर्शनास आणून दिल्या. तसंच या संदर्भात मुख्यमंत्र्यांनाही माहिती दिली. त्यांनंतर मुख्यमंत्र्यांनी परिस्थिती सौम्यपणे हाताळण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.