scorecardresearch

Covid 19 : राज्यात दिवसभरात १ हजार ७४४ रूग्ण करोनामुक्त ; १ हजार ६३२ नवीन करोनाबाधित

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.४६ टक्के एवढे झाले आहे.

corona-maharashtra
(प्रातिनिधीक फोटो)

राज्यात आज दिवसभरात १ हजार ७४४ रूग्ण करोनामधून बरे झाले असून, १ हजार ६३२ नवीन करोनाबाधित आढळले आहेत. याचबरोबर ४० करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू देखील झाला आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण ६४,३२,१३८ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ९७.४६ टक्के एवढे झाले आहे.

आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६५,९९,८५० झाली आहे. तर, राज्यात आजापर्यंत १३९९६५ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,१६,२६,२९९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५,९९,८५० (१०.७१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १,९८,९५८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ९९८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण २४,१३८ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-10-2021 at 20:50 IST