राज्यातील करोना संसर्गाची दुसरी लाट आता ओसरल्यात जमा आहे. दररोज आढळणाऱ्या करोनाबाधितांच्या संख्येत चांगलीच घट झाल्याचे दिसत आहे. शिवाय, करोनातून बरे होणाऱ्यांच्या संख्येतही वाढ सुरू आहे. राज्यात आज दिवसभरात १ हजार ७८१ रूग्ण करोनामुक्त झाले असून, १ हजार ७०१ नवीन करोनाबाधित आढळले आहेत. तर, ३३ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण ६४,३३,९१९ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७.४६ टक्के एवढे झाले आहे.

आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६६,०१,५५१ झाली आहे. तर, राज्यात आजपर्यंत १३९९९८ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,१७,६२,९६३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६६,०१,५५१ (१०.६९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १,९५,६०३ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ९२६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण २४,०२२ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.